29 C
Mumbai
Sunday, November 17, 2024
घरअर्थजगतभारत हा जगातील ‘स्टार परफॉर्मर’ - आंतरराष्ट्रीय नाणेनिधी

भारत हा जगातील ‘स्टार परफॉर्मर’ – आंतरराष्ट्रीय नाणेनिधी

जागतिक वाढीमध्ये भारताचे मोठे योगदान

Google News Follow

Related

इंटरनॅशनल मॉनेटरी फंड (IMF) म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताचे कौतुक केले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारताचे कौतुक केले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताचे वर्णन जगातील ‘स्टार परफॉर्मर’ म्हणून केलं आहे. तसेच जागतिक वाढीमध्ये भारताचे मोठे योगदान आहे. डिजिटलायझेशन आणि पायाभूत सुविधांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात आर्थिक सुधारणांमुळे भारताचा विकास दर मजबूत असल्याचं आंतरराष्ट्रीय संस्थेनं म्हटलं आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे की, “भारत यावर्षी जागतिक विकासामध्ये १६ टक्क्यांहून अधिक योगदान देत आहे. भारत यावर्षी जगातील सर्वात वेगानं वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहे.” पीटीआयच्या वृत्तानुसार, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमधील भारताच्या मिशनबाबत नाडा चौईरी म्हणाले की, “आम्ही काही काळापासून पाहत आहोत की, भारत खूप चांगल्या दरासह विकास करत आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या सोबतच्या देशांकडे पाहता, तेव्हा वास्तविक वाढीच्या बाबतीत ते स्टार परफॉर्मर्सपैकी एक आहे. हे सर्वात वेगानं वाढणाऱ्या मोठ्या उदयोन्मुख बाजारपेठांपैकी एक आहे.”

नादा चौरी म्हणाल्या की, “भारताची लोकसंख्या खूप मोठी, तरुण आणि वाढती आहे. जर ही क्षमता संरचनात्मक सुधारणांद्वारे वापरली गेली, तर ती मजबूतीने वाढण्याची क्षमता आहे. भारत सरकारने अनेक संरचनात्मक सुधारणा हाती घेतल्या आहेत, त्यातील प्रमुख सुधारणा म्हणजे डिजिटलायझेशन, जी अनेक वर्षांपासून विकसित होत आहे आणि भविष्यात उत्पादकता आणि वाढीसाठी भारताला मजबूत व्यासपीठावर आणले आहे.”

हे ही वाचा:

चीनमधील भूकंपात १११ ठार; २३० जखमी!

तामिळनाडूत पुरामुळे हाहाःकार; रेल्वे स्थानकावर ८०० प्रवासी अडकले

लोकसभेत टेलिकॉम विधेयक सादर

खर्गे म्हणतात, ‘ एक महिन्याचे वेतन काँग्रेसला दान केले’

“गुंतवणूक आणि विकासासाठी राजकीय स्थैर्य महत्त्वाचे आहे. व्यवसायांना चालना देण्यासाठी सरकारने अनेक महत्त्वाची पावलं उचलली आहेत. कंपन्यांसाठी सिंगल नॅशनल विंडो, वन- स्टॉप शॉप यांसारखी अनेक महत्त्वाची पावलं उचलण्यात आली आहेतमं,” असंही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटलं आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा