भारत करणार चौथ्या औद्योगिक क्रांतीचे नेतृत्व

india-has-potential-to-lead-fourth-industrial-revolution-pm-narendra-modi

भारत करणार चौथ्या औद्योगिक क्रांतीचे नेतृत्व

भारतामध्ये चौथ्या औद्योगिक क्रांतीचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे आणि देशाला जागतिक उत्पादन केंद्र बनवण्यासाठी सरकारने सुधारणा हाती घेतल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. चौथी औद्योगिक क्रांती जितकी नवीन तंत्रज्ञानाशी संबंधित आहे तितकीच ती नव्या विचारसरणीशीही संबंधित आहे असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.

गुजरातमधील केवडीया येथे सुरु असलेलया ‘इंडस्ट्री ४.०’ परिषदेत मार्गदर्शन करतांना पंतप्रधान म्हणाले की ‘विविध कारणांमुळे भारत मागील औद्योगिक क्रांतीचा एक भाग होण्यापासून मुकला. पण, भारतामध्ये ‘इंडस्ट्री ४.०’ चे नेतृत्व करण्याची क्षमता आहे.याचे कारण स्पष्ट करताना पंतप्रधान म्हणाले की, अलीकडच्या इतिहासात पहिल्यांदाच आपल्याकडे लोकसंख्या, मागणी आणि निर्णायक प्रशासन असे अनेक भिन्न घटक एकत्र आहेत.

जड उद्योग मंत्रालयाचे सहसचिव यांनी येथे ‘इंडस्ट्री ४.०’ या परिषदेत पंतप्रधानांचा संदेश वाचून दाखवला. भारताला जागतिक मूल्य साखळीतील महत्त्वाचा दुवा बनवण्यात उद्योग आणि उद्योजक महत्त्वाची भूमिका बजावतात. आम्ही भारताला जगातील तंत्रज्ञानावर आधारित उत्पादन केंद्र बनवण्यासाठी सुधारणा आणि प्रोत्साहनांना बळ दिले आहे आज उत्पादन क्षेत्रात तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. देश जागतिक उत्पादन केंद्र बनत आहे या बद्दल पंतप्रधानांनी विश्वास व्यक्त केला.

हे ही वाचा:

सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे निधन

मुंबईतल्या गोडाऊनमधून १०० कोटींचे एमडी जप्त

उत्तर प्रदेशमध्ये तरुणाने अमित बनून हिंदू मुलीवर केला बलात्कार

मेस्सी म्हणतो हा माझा शेवटचा विश्वचषक

कार्यक्रमात अवजड उद्योग मंत्री महेंद्र नाथ पांडे म्हणाले की, सरकार ‘औद्योगिक क्रांती ४.०’ च्या माध्यमातून उत्पादनाला चालना देण्यासाठी अनेक पावले उचलत आहे. ते म्हणाले, “भारत जागतिक उत्पादन केंद्र बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.३डी प्रिंटिंग, मशीन लर्निंग, डेटा ऍनालिटिक्स आणि आयओटी हे औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी महत्त्वाचे आहेत.आज कारपासून दुचाकीपर्यंत इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे, परंतु भारताला बॅटरी आयात कराव्या लागतात. त्यामुळे वाहनांची किंमत वाढते. सरकारने ऍडव्हान्स केमिस्ट्री सेलबॅटरी स्टोरेजसाठी उत्पादनाशी निगडीत प्रोत्साहन योजना सुरू केली आहे. यामुळे देशात बॅटरीचे उत्पादन होईल. त्यामुळे आयातीत कपात होईल आणि आगामी काळात निर्यातही होऊ शकेल.

Exit mobile version