भारताने दूरसंचार क्षेत्रातील चीनची घुसखोरी रोखण्यासाठी विश्वसनीय उत्पादनांची यादी बनवली आहे. दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांनी या विश्वसनीय उत्पादकांकडूनच ही उपकरणे खरेदी करावीत असे निर्बंध आणले आहेत.
१५ जूनपासून या नियमाच्या अंमलबजावणीला सुरूवात होणार आहे. दूरसंचार कंपन्यांना पाठवण्यात आलेल्या संदेशानुसार दूरसंचार क्षेत्राने सुरक्षेच्या कारणास्तव विश्वसनीय उत्पादकांकडूनच उपकरणे खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
हा आदेश १५ जून २०२१ पासून लागू करण्यात येणार आहे. या नंतर अधिकारी संस्थेने विश्वसनीय ठरवलेल्या उत्पादकांकडूनच दूरसंचार क्षेत्रातील उपकरणे खरेदी करावी लागतील. चालू जाळ्यात विश्वसनीय उत्पादकांकडील उपकरणे नसतील, तर त्यांच्या आधुनिकीकरणासाठी अधिकारी संस्थेची परवानगी घेणे भाग आहे. मात्र याचा सध्याच्या देखभालीच्या कंत्राटांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे दूरसंचार विभागाने सांगितले आहे.
हे ही वाचा:
भारताच्या कोविड-१९ केसेसपैकी पन्नास टक्क्याहून जास्त केसेस ‘या’ राज्यातून
या नव्या बदलान्वये भारत सरकार अधिकारी संस्थेच्या मार्फत दूरसंचार क्षेत्रांतील भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक वस्तूंच्या खरेदीवर निर्बंध ठेवू शकणार आहे.
ही अधिकारी संस्था विश्वसनीय उत्पादक आणि स्रोतांबरोबरच विश्वसनीय उपकरणांची यादी देखील बनवणार आहे. त्यामुळे या यादीनुसार ही उपकरणे खरेदी करणे भाग राहणार आहे.
या कायद्याच्या अंमलबजावणीनंतर चीनी कंपन्यांना भारतीय दूरसंचार क्षेत्रात शिरकाव करणे अवघड होणार आहे.