भारताने शेजारील देशांसाठी प्रथमच कोळशाची निर्यात केली आहे. या निर्यातीत नेपाळला मोठा हिस्सा प्राप्त झाला आहे.
भारतातून २०२०-२१ या आर्थिक वर्षात सुमारे ८ लाख टन कोळशाची निर्यात करण्यात आली होती. यापैकी साधारणपणे ७७.२० टक्के हिस्सा नेपाळला निर्यात करण्यात आला होता.
केंद्रीय कोळसा मंत्रालयाच्या कोळशाच्या संदर्भातील २०२०-२१ च्या आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे. नेपाळसोबतच बांगलादेशला देखील कोळसा निर्यात केला गेला होता. कोळशाच्या एकूण उत्पादनापैकी १३.०४ टक्के कोळशाची निर्यात बांगलादेशला करण्यात आली होती.
हे ही वाचा:
लोकलबंदीमुळे बेस्टने उचलला प्रवाशांचा भार
४०० लोक उतरले रस्त्यावर आणि केली कमाल
८ वाजता मुख्यमंत्र्यांचा लाईव्ह संवाद! काय नवीन जबाबदारी टाकणार?
…आणि धाडसी पत्रकारितेचा डांगोरा पिटणाऱ्या एनडीटीव्हीची उडाली भंबेरी
भारतामध्ये मागणीच्या तुलनेत पुरवठा थोडा कमी असला आणि भारताला काही प्रमाणात कोळशाची आयात करावी लागली असली तरीही शेजाऱ्यांना भारताने काही प्रमाणात आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये कोळसा निर्यात केली आहे, असे देखील मंत्रालयाच्या आकडेवारीत म्हटले आहे.
मंत्रालयाच्या अहवालात म्हटल्याप्रमाणे पुरेसा कोळशाचा साठा असूनही आपण आपल्याच उत्पादनाच्या आधारे मागणी पूर्ण करू शकलो नाही. त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे, राखेचे प्रमाण कमी असलेल्या, उच्च दर्जाच्या कोळशाचा देशांतर्गत पुरवठा मर्यादित प्रमाणात आहे, असे देखील या आकडेवारीतून समोर आले आहे.
भारत उच्च दर्जाच्या विशेषतः राखेचे प्रमाण कमी असणाऱ्या कोळशासाठी या आयातीवर अवलंबून असतो. आयातीद्वारे या कोळशाच्या मागणी आणि पुरवठ्यातील तफावत भरून काढली जाते. उच्च दर्जाच्या कोळशाचा उपयोग औद्योगिक वापरासाठी केला जातो.
भारत कोळशाची आयात करत असला तरीही, आर्थिक वर्ष २१ मध्ये कोळशाच्या आयातीत घट झाली आहे. भारताची कोळशाची आयात यंदा १३.५० टक्क्यांनी कमी झाली असल्याचे देखील या आकडेवारीतून समोर आले आहे.