भारताच्या रोख हस्तांतरण योजनेवर कौतुकाचा वर्षाव

रोख हस्तांतरण योजनेची अंमलबजावणी हा लॉजिस्टिक चमत्कार

भारताच्या रोख हस्तांतरण योजनेवर कौतुकाचा वर्षाव

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताच्या रोख हस्तांतरण योजनेचे खुलेपणाने कौतुक केले आहे. भारताच्या आकारमानाचा विचार करता रोख हस्तांतरण योजनेची अंमलबजावणी हा लॉजिस्टिक चमत्कार आहे. इतर देशांनी भारताकडून खूप काही शिकण्याची गरज असल्याचे आयएमएफच्या आर्थिक व्यवहार विभागाचे उपसंचालक पाओलो मोरो यांनी म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक गटाच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सच्या वार्षिक बैठकीत पाओलो मोरो यांनी हे वक्तव्य केलं आहे.

भारत सरकारने थेट लाभ हस्तांतरण कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीशी संबंधित प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले, “देशाचा आकार पाहता ज्या पद्धतीने हे कार्यक्रम गरीब लोकांना मदत करण्यासाठी सुरू केले गेले हा एक ‘लॉजिस्टिक चमत्कार’ आहे. लाखोंच्या संख्येने लोकांपर्यंत पोहोचले आहे असेही ते म्हणाले. “युनिक आयडेंटिफिकेशन सिस्टम म्हणजेच ‘आधार’चा वापर ही भारताच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधले

भारताची विशालता आणि लोकसंख्या अधोरेखित करताना ते म्हणाले की, रोख हस्तांतरण योजना हा एक लॉजिस्टिक चमत्कार आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही योजना लाखो कमी उत्पन्न असलेल्या लोकांपर्यंत पोहोचवली आहे. विशेषत: महिला, वृद्ध आणि शेतकरी यांना लक्ष्य करणारे कार्यक्रम आहेत असही ते म्हणाले. देशाने जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून आपले स्थान कायम ठेवण्याच्या क्षणाला .भारताच्या रोख हस्तांतरण योजनेनेची प्रशंसा नाणेनिधीने केली आहे.

हे ही वाचा:

मुंबई, दिल्लीत दहशतवादविरोधी बैठक

इराणमधील महसा अमिनी प्रकरण जगासमोर आणणाऱ्या महिला पत्रकाराला अटक

ठाकरे गटाच्या मशालीवर ‘या’ पक्षाने केला दावा

उद्धव ठाकरेंच्या तीन नेत्यांवर गुन्हा दाखल

सरकारी आकडेवारीनुसार,२०१३ पासून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे लाभार्थ्यांना २४.८लाख कोटी रुपयांहून अधिक वितरित केले गेले आहेत, त्यापैकी ६.३ लाख कोटी रुपयांचे लाभ केवळ २०२१-२२ मध्ये वितरित केले गेले. २०२१-२२ च्या आकडेवारीनुसार सरासरी ९० लाखाहून अधिक डीबीटी पेमेंट दररोज केले जातात.

Exit mobile version