२०२० मध्ये कोविड-१९ साथीच्या रोगामुळे व्यापार प्रवाह विस्कळीत झाल्यामुळे १५ वर्षांत प्रथमच, भारताने अरब देशांच्या समुहाला कृषी व्यवसाय उत्पादनांच्या निर्यात करण्यामध्ये ब्राझीलला मागे टाकले आहे.
अरब-ब्राझील चेंबर ऑफ कॉमर्सने रॉयटर्सला दिलेल्या माहितीनुसार, २२ लीग सदस्यांनी मागच्या वर्षी आयात केलेल्या एकूण कृषी व्यवसाय उत्पादनांपैकी ८.१५ टक्के ब्राझीलचा वाटा होता, तर भारताने त्या व्यापारातील ८.२५ टक्के हिस्सा ताब्यात घेतला होता. ज्यामुळे ब्राझीलचा १५ वर्षांचा फायदा संपला.
अहवालानुसार, पारंपारिक शिपिंग मार्गांमध्ये व्यत्यय आल्याने ब्राझीलने भारत आणि तुर्की, युनायटेड स्टेट्स, फ्रान्स आणि अर्जेंटिना यांसारख्या इतर निर्यातदारांना आपले स्थान गमावले.
अरब जग हे ब्राझीलच्या सर्वात महत्त्वाच्या व्यापार भागीदारांपैकी एक आहे, परंतु कोविड-१९ साथीच्या रोगाने जागतिक रसद विस्कळीत झाली आहे. अरब-ब्राझील चेंबर ऑफ कॉमर्सने सांगितले की, सौदी अरेबियाला ब्राझीलच्या शिपमेंट्सला आता ६० दिवस लागतात, जे साथीच्या आजाराच्या आधी ३० दिवस होते.
हे ही वाचा:
सीडीएस बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर कोसळले
प्राजक्त तनपुरे किरीट सोमय्यांच्या रडारवर
…म्हणून पंतप्रधान मोदींनी थोपटली योगींची पाठ
चंद्रावर जाणार भारतीय वंशाचे अनिल मेनन
भारताच्या भौगोलिक फायद्यांमुळे भारत फळे, भाज्या, साखर, धान्य आणि मांस आठवड्यातून कमी वेळात अरब देशांना पुरवू शकतो. अरब लीगमध्ये ब्राझीलची कृषी निर्यात गेल्या वर्षी केवळ १.४% वाढून $८.१७ अब्ज झाली. या वर्षी जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान, लॉजिस्टिक समस्या कमी झाल्यामुळे विक्री एकूण $६.७८ अब्ज, ५.५% वाढली आहे असं डेटा दर्शवितो.