25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरअर्थजगतब्रिटनकडून 'लगान' वसूल करण्याची वेळ

ब्रिटनकडून ‘लगान’ वसूल करण्याची वेळ

Google News Follow

Related

ब्रिटनला मागे टाकत भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला. अमेरिका, चीन, जपान आणि जर्मनीनंतर आता भारताचा क्रमांक लागला आहे. तर ब्रिटन सध्या अर्थव्यवस्थेत जगात सहाव्या क्रमांकावर गेला आहे. महत्वाचं म्हणजे ज्या ब्रिटनने १९४७ पर्यंत भारतावर अधिराज्य गाजवलं त्याच ब्रिटनला भारताने मागे टाकलं आहे. भारतने एकदा नाही तर दोनदा ब्रिटनला मागे टाकलं आहे. यापूर्वी २०२१ मध्येही ब्रिटनवर ही परिस्थिती आली होती.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या आकेडवारीनुसार, भारत जगात अर्थव्यस्थेत पाचव्या स्थानावर आहे. भारताची आजच्या घडीला अर्थव्यवस्था जवळपास ३ पूर्णांक ५ ट्रिलियन डॉलर आहे. भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच एप्रिल ते जून दरम्यान भारताचा जीडीपी १३ पूर्णांक ५ टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे भारताची अर्थव्यवस्था या वर्षी सात टक्क्यांनी वाढेल असंही म्हटलं जातं आहे.

भारताची अर्थव्यवस्था झपाट्याने वाढतेय, याचं कारण म्हणजे मोदी सरकार अर्थव्यवस्थेच्या बाबतीत घेत असलेले निर्णय. २०१४ मध्ये भारत आर्थिकदृष्ट्या दहाव्या क्रमांकावर होता. आठ वर्षाच्या काळात भारतच्या अर्थव्यवस्थेने मोठी झेप घेतली असून आता भारत पाचव्या स्थानावर पोहचला आहे. २०१५ मध्ये भारताचा जिडीपी ७ पूर्णांक ४ टक्के होता मधल्या वर्षात जीडीपीमध्ये चढउतार होतच राहिले. २०२० मध्ये कोरोना महामारी मग रशिया युक्रेन युद्ध या सर्वांचा सामना करून सध्या भारताचा जीडीपी जवळपास ८ पूर्णांक ९ टक्के आहे.

भारताची जी आत्मनिर्भरतेच्या दिशेने सुरु असलेली वाटचाल याचा मोठा सकारात्मक परिणाम अर्थव्यवस्थेवर आहे. स्टार्टअप इंडियाला जो संपूर्ण भारतातून प्रतिसाद मिळतोय.पुढे मग मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया स्किल इंडिया या अशा केंद्र सरकारच्या योजनांचा भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होतं आहे. आठ वर्षांच्या अर्थव्यवस्थेत डिजिटल पेमेंट हा एक महत्त्वाचा घटक मानला जातो. जगभरातल्या डिजिटल व्यवहारांच्या तुलनेत भारतात ४० टक्के डिजिटल व्यवहार होतात. तसेच अर्थव्यवस्थेत निर्गुंतवणूकसुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे. २०१५ ते २०२२ या कालावधीत ३ पूर्णांक ८ लाख कोटींची निर्गुंतवणूक करण्यात सरकार यशस्वी ठरलं. एलआयसीचे समभाग विकून सरकारने आयपीओद्वारे २० हजार ५१६ कोटींची कमाई केली.

मोदी सरकारच्या कार्यकाळात कोरोना महामारी हे मोठं आव्हान होतं. महामारी संपल्यानंतर अर्थव्यवस्थेसमोर नवं आव्हान उभं राहिलं ते रशिया आणि युक्रेन युद्धाचं. या युद्धामुळे जगभरात महागाई वाढली. जागतिक स्तरावर गहू, खाद्यतेल अशा महत्त्वाच्या जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढल्या. त्याचा परिणाम भारतावरही झाला. मात्र या वस्तूंच्या किंमती नियंत्रणात रहाव्यात यसाठी सरकारने अनेक प्रय़त्न केले. अशी सर्व परिस्थिती असूनही भारताची अर्थव्यवस्था ब्रिटनला मागे टाकून जगात पाचव्या स्थानावर पोहचली. ज्या ब्रिटनने भारतावर राज्य केलं त्याच ब्रिटनला भारताने मागे टाकलं आहे.

भारत पूर्वीपासूनच अर्थव्यवस्था, संस्कृती आणि राजकारणाने समृद्ध होता. पण परकीयांच्या आक्रमणामुळे आणि त्यांच्या राजवटीमुळे भारतात अधोगती झाली. भारतातील ब्रिटिश राज्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक देशाच्या अर्थव्यवस्थेला खिंडार पाडले. भारताची जी काही संपत्ती होती ती ब्रिटिशांनी इंग्लंडमध्ये नेली. ब्रिटिशांच्या काळात भारताच्या पारंपरिक उद्योगांचा ऱ्हास झाला आणि आधुनिक उद्योगांचा अपुरा विकास झाला. ब्रिटिशांनी आपल्या औद्योगिक आणि व्यावसायिक धोरणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली. पण याच भारताच्या अर्थव्यवस्थेने शून्यापासून सुरुवात करून आजच्या घडीला ब्रिटनला मागे टाकले. गेल्या चार दशकांपासून ब्रिटनमध्ये महागाई वाढतेय या देशावर सध्या मंदीचे सावट आहे. महत्वाचं म्हणजे ब्रिटनमध्ये ‘कॉस्ट ऑफ लिव्हिंग’ म्हणजेच लोकांच्या राहणीमानाचा खर्च सातत्याने वाढतोय. यात आता ब्रिटनमध्ये पंतप्रधान पदाची निवडणूक लागली आहे.

इतर देशांच्या तुलनेत भारतात मनुष्यबळ भक्कम आहे. भारतची अर्थव्यवस्था ज्या स्थरावर पोहचलीय त्यामध्ये भारताच्या सेवा आणि कृषी क्षेत्राचाही मोठा वाटा आहे. नुकतंच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या आर्थिक संशोधन विभागाने एक दावा केला की, येत्या सात वर्षात म्हणजेच २०२९ पर्यंत हीच भारताची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या स्थानावर पोहचेल. सोबतच नुकतंच एका संशोधनातून समोर आलेलं की, भारतातून इंग्रजांनी तब्बल ४५ ट्रिलियन डॉलर इतकी संपत्ती आपल्या देशात नेली. इंग्रजांच्या राजवटीत भारत कुपोषित, शोषित बनला. इंग्रजांच्या या शोषणाविरोधात भारताचे आद्य स्वातंत्र्यसेनानी दादाभाई नौरोजी यांनी आवाज उठविला होता. त्यांनी इंग्रजांच्या आर्थिक शोषणाविरोधात लढा दिला. ब्रिटिश संसदेत ते खासदार झालेले पहिले भारतीय होते. भारताचे कसे शोषण होते आहे, याचा पाढाच त्यांनी ब्रिटिश संसदेत वाचून दाखविला होता. त्यावर त्यांनी पुस्तकेसुद्धा लिहिली होती. त्यांच्या ४ सप्टेंबर या जयंतीदरम्यानच ब्रिटनला अर्थव्यवस्थेत आपण मागे टाकल्याची चांगली बातमी समोर आली. एकप्रकारे दादाभाई यांना ती आदरांजलीच म्हणावी लागेल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा