25 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरअर्थजगतस्टार्टअपमध्ये भारताचा डंका

स्टार्टअपमध्ये भारताचा डंका

स्वातंत्र्यदिनापासून राज्यात स्टार्टअप यात्रा

Google News Follow

Related

देशात अनेक वर्षांपासून स्टार्टअप संकल्पना उभारी घेत आहे. दररोज नोंदणी होणाऱ्या स्टार्टअपची संख्या भारतात सर्वाधिक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ मध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त देशात उद्योगाला चालना देण्यासाठी स्टार्टअप संकल्पनेला उभारी दिली.

सध्या भारतात प्रतिदिन जवळपास ८० स्टार्टअपची नोंदणी होत आहे. २०१५ ला पंतप्रधान मोदींनी या संकल्पनेची घोषणा केली होती. गेल्या सहा वर्षांमध्ये अनेक यशस्वी स्टार्टअपची उभारणी केली आहे. सुरुवातीला भारतात १० हजार स्टार्टअपची नोंद करण्यासाठी ८०८ दिवसांचा कालावधी लागत होता. तर शेवटचे १० हजार स्टार्टअप अवघ्या १५६ दिवसांत नोंदवले गेले आहेत. मोदी सरकारने २०१६ मध्ये स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी कार्यक्रम सुरु केले होते.

केंद्र सरकारकडून १ एप्रिल २०२१ पासून ‘स्टार्टअप भारत बीजनिधी योजना’ सुरू करण्यात आली. या योजनेतून मान्यताप्राप्त स्टार्टअप संकल्पनांचा पाठपुरावा, उत्पादनांच्या चाचण्या, व्यावसायीकरण आदींसाठी आर्थिक मदत करण्यात येते. त्यामुळे स्टार्टअप गुंतवणूक आकर्षित करण्यात किंवा बॅंकांकडून कर्ज घेण्यात सक्षम होत आहेत. देशाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाकडून स्टार्टअपना मान्यता दिली जाते.

देशात स्टार्टअपमुळे रोजगारनिर्मितीला मोठा हातभार लागत आहे. स्टार्टअपमुळे सुमारे साडेसात लाख रोजगार तयार झाले आहेत. दरवर्षी देशात स्टार्टअपमुळे रोजगारांमध्ये ११० टक्क्यांनी वाढ होत आहे.

हे ही वाचा:

नुपूर शर्मांची हत्या करण्यासाठी आलेल्या दोन दहशतवाद्यांच्या आवळल्या मुसक्या

धक्कादायक! जळगावमध्ये भावाकडून बहिणीसह प्रियकराची हत्या

समीर वानखेडेंना जातप्रमाणपत्र पडताळणी समितीकडून क्लीनचीट

‘तुमच्या पदकांनी युवकांना प्रेरणा मिळेल’

स्वातंत्र्यदिनापासून राज्यात स्टार्टअप यात्रा

महाराष्ट्रात स्टार्टअपला चालना देण्यासाठी १५ ऑगस्टपासून ‘महाराष्ट्र स्टार्टअप आणि नावीन्यता’ यात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी राज्यातील सहा विभागांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. नवसंकल्पना घेऊन येणाऱ्या युवक-युवतींना प्रशिक्षण, तसेच त्यांच्या संकल्पनांचे सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा