२०३० पर्यंत बहुतांश वाहने पर्यायी इंधनावर धावतील

वाहन उद्योगाची उलाढाल २०२४ च्या अखेरीस १५ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढण्याचे उद्दीष्ट

२०३० पर्यंत बहुतांश वाहने पर्यायी इंधनावर धावतील

भारताला ऑटोमोबाईल उत्पादनासाठी जागतिक केंद्र बनवण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून पुढील दोन वर्षांत या क्षेत्राची वाढ दुप्पट करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवण्यात आहे. वाहन उद्योगाची उलाढाल २०२४ च्या अखेरीस दुपटीने वाढवून ती १५ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. भारतीय वाहन उद्योगाला जगात नंबर वन बनवण्याचे ध्येय आहे असे.रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

आपले मंत्रालय पुढील वर्षी पाच लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांवर काम करणार असल्याचेही गडकरी म्हणाले. यामध्ये सरकारकडून दोन लाख कोटी रुपये आणि उर्वरित भांडवल बाजारातून उभे केले जाणार आहे.आम्ही बायो-इथेनॉल, बायो-सीएनजी, बायो-एलएनजी आणि ग्रीन हायड्रोजन यांसारखे पर्यायी, स्वच्छ आणि हरित इंधन विकसित करण्यावर काम करत आहोत,असेही ते पुढे म्हणाले. ग्रीन हायड्रोजन हे भविष्यातील इंधन असेल, असे गडकरी म्हणाले.

हे ही वाचा:

पंतप्रधानांच्या मातोश्री हीराबेन यांची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल

मुंबई महाराष्ट्राचीच, ती कोणाच्या बापाची नाही

तैलचित्रातून दिसेल बाळासाहेबांचा वारसदार

खंडणी प्रकरणी उद्धव ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकाला अटक

मर्चंट्स चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या ऑनलाइन सत्राला संबोधित करताना ते म्हणाले, “सध्या वाहन उद्योगाचा आकार ७.५ लाख कोटी रुपये आहे आणि २०२४ पर्यंत १५ लाख कोटी रुपयांवर नेण्याचे लक्ष्य आहे. यासह भारत या क्षेत्रात जगातील अव्वल देशांमध्ये असेल. २०३० पर्यंत बहुतांश वाहने पर्यायी इंधनावर धावतील, असेही गडकरी म्हणाले.

Exit mobile version