देशात आणखी वेगवान डेटा आणि इंटरनेट सेवा देणाऱ्या ५ जी स्पेक्ट्रम लिलावात अखेर उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओने बाजी मारली आहे. या लिलावात एकूण ७१% स्पेक्ट्रमची विक्री झाली.रिलायन्स जिओने ५जी स्पेक्ट्रमचा सर्वाधिक हिस्सा बोली लावून विकत घेतला आहे. जिओने तब्बल ८८,००० कोटी रुपयांचे स्पेक्ट्रम खरेदी करून गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या ५जी स्पेक्ट्रम लिलावाला पूर्ण विराम दिला.
विशेष म्हणजे मुकेश अंबानींच्या जिओने अदानी समूहापेक्षा ४१५ पट जास्त स्पेक्ट्रमसाठी बोली लावली आहे. जिओ हा एकमेव बोलीदार आहे ज्याने सर्व २२ मंडळांमध्ये ७०० मेगाहर्ट्झचे अधिग्रहण केले आहे. ७०० मेगाहर्ट्झची श्रेणी ५ ते १० किमी आहे. जिओने ८८,०७८ कोटी रुपयांच्या रकमेसह २४७४० मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम विकत घेतले असल्याचे केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.
हे ही वाचा:
‘मासिक पाळी’ प्रकरणातील मुलीनेच रचला होता बनाव!
अल कायदाचा म्होरक्या अल जवाहिरीला ड्रोनने टिपले
कोणाला किती स्पेक्ट्रम जाणून घ्या
लिलावाच्या ताज्या फेरीत एकूण ५जी स्पेक्ट्रमच्या ७१ टक्के साठी १,५०,१७३ कोटी रुपयांच्या बोली प्राप्त झाल्या.
अदानी समूहाने २६ गिगाहर्ट्झ ४०० मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम मिळवले.
भारती एअरटेलला विविध बँडमध्ये १९, ८६७ मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम मिळवले.
रिलायन्स जिओ २४,७४० मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रमसह ५ जी स्पेक्ट्रम लिलावात अव्वल स्थानावर आहे.
लिलावाच्या झाल्या ४० फेऱ्या
भारतात ५जी स्पेक्ट्रमचा पहिला लिलाव २६ जुलै रोजी सुरू झाला. गेल्या सात दिवसांत बोलीच्या एकूण ४० फेऱ्यांनंतर लिलाव पूर्ण झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ४० फेऱ्यांनंतर मिळालेल्या बोलींचे तात्पुरते मूल्य १,५०,१७३ कोटी रुपये होते. लिलावाच्या सातव्या आणि शेवटच्या दिवशी ४३ कोटी रुपयांच्या बोली लागल्या. २६ जुलै रोजी लिलावाच्या पहिल्या दिवशी १.४५ लाख कोटी रुपयांच्या बोली मिळाल्या. पहिल्या दिवशी स्पेक्ट्रम बोलीच्या चार फेऱ्या झाल्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिलायन्स जिओ सर्वात आक्रमक बोली लावणारी आहे.