सध्याच्या घडीला आपल्या सर्वांमध्ये आता निवृत्तीवेतनाबाबत जागृती होऊ लागल्याचे दिसून आलेले आहे. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (पीएफआरडीए) ने शुक्रवारी सांगितले की, त्यांच्या प्रमुख पेन्शन योजनांमधील ग्राहक संख्या या वर्षी ऑगस्टमध्ये २४ टक्क्यांनी वाढून ४.५३ कोटींवर गेली आहे.
पीएफआरडीए राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (एनपीएस) आणि अटल पेन्शन योजना (एपीवाय) या दोन पेन्शन योजनांचे व्यवस्थापन करते. “राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (एनपीएस) अंतर्गत विविध योजनांच्या ग्राहकांची संख्या ऑगस्ट २०२१ च्या अखेरीस 4 कोटी ५३ लाख ४१ हजारांवर पोहोचली. ऑगस्ट २०२० मध्ये ३ कोटी ६५ लाख ४७ हजार इतकी होती. एका वर्षात ही वाढ २४.०६ टक्के इतकी झालेली आहे.
हे ही वाचा:
अफगाणिस्तानमध्ये तालिबानांनी बंद केले महिलांना मंत्रालयाचे दरवाजे
महापालिकेला खड्ड्यात घालणाऱ्या रस्तेकामांच्या निविदा रद्द करून फेरनिविदा मागवा!
नितीन गडकरींच्या व्हीडिओंना मिळत आहे इतकी रक्कम
पश्चिम आणि मध्य रेल्वेने प्रवास करतायत ४० लाख लोक
पीएफआरडीएच्या आकडेवारीनुसार एपीवाय अंतर्गत पेन्शन योजनेच्या सदस्यांची संख्या ३३.२० टक्क्यांनी वाढलेली आहे. ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत हा आकडा ३ कोटी ०४ लाख ५१ हजारांवर पोहोचलेला आहे. एकूणच निवृत्ती वेतनाची वाढ आता ६,४७,६२१ कोटी रुपये इतकी झालेली आहे. म्हणजे वार्षिक वाढ ३२.९१ टक्के झालेली आहे. त्यापैकी अटल पेन्शन अंतर्गत १८,०५९ कोटी रुपये इतके आहे. अटल पेन्शन योजना ही खुप प्रसिद्ध अशी योजना आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यामध्ये जवळपास ३३ टक्क्यांनी वाढ झालेली आहे. अटल पेन्शन योजना असंघटित क्षेत्रातील श्रमिकांसाठी खूप लाभदायक आहे.
सध्याच्या घडीला एनपीएसची लोकप्रियताही तुफान आहे. ही एक खूप महत्त्वाची योजना मानली जाते. पीएफडीआरए यांच्याकडून ही योजना राबवली जाते. खासगी कंपन्यासुद्धा एनपीएसचा पर्याय कर्मचारी वर्गाला उपलब्ध करून देतात.