भारतीय अर्थव्यवस्थेला उभारी देणारी माहिती समोर आली आहे. भारताच्या परकीय चलन गंगाजळीत वाढ झाली आहे. परकीय चलनात वाढ होऊन गंगाजळी ५७२ अब्ज डॉलरवर पोहचली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार, ५ मे रोजी संपलेल्या आठवड्याच्या अवधीत गंगाजळी ७.१९ अब्ज डॉलरने वाढून ५७२ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. त्याआधीच्या आठवड्यात गंगाजळी ४.५३ अब्ज डॉलरने आटत ५८८.७८ अब्ज डॉलर नोंदण्यात आली होती.
ऑक्टोबर २०२१ मध्ये परकीय चलन गंगाजळीने ६४५ अब्ज डॉलर अशी उच्चांकी पातळी गाठली होती. त्यानंतर थोडा उतार दिसून आला होता. भांडवली बाजारात झालेली घसरण, रशिया- युक्रेन युद्ध, खनिज तेलाच्या दरातील मोठे चढ- उतार, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या निधीचे निर्गमन हे परकीय गंगाजळी घसरणीतील प्रमुख घटक होते.
हे ही वाचा:
चीनमध्ये एक लाखाहून अधिक भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई
देशातील सर्वात मोठा सिम कार्ड घोटाळा उघड
आपल्या नावाने केल्या जाणाऱ्या बनावट जाहिरातींविरोधात सचिनची तक्रार
मैत्रिणीला कॉकपिटमध्ये बोलावणारा वैमानिक निलंबित; ३० लाखांचा दंड
विशेषतः रिझर्व्ह बँकेकडून गेल्या वर्षी अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयातील मूल्य घसरण रोखण्यासाठी डॉलरची मोठ्या प्रमाणावर विक्री करण्यात आल्याने परकीय चलन गंगाजळीत मोठी घसरण झाली होती. गेल्या वर्षी रुपया ८३ या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर गडगडल्याने त्याला सावरण्यासाठी हस्तक्षेप करताना, रिझर्व्ह बँकेकडून गंगाजळीतील डॉलर खुले केले गेले होते.