७ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त झाले पण म्हणजे नेमके कसे?

अर्थमंत्र्यांची पगारदारांसाठी मोठी घोषणा

७ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त झाले पण म्हणजे नेमके कसे?

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेमध्ये अर्थ संकल्प मांडला आहे. या अर्थ संकल्पात मोदी सरकारने पगारदार वर्गासाठी मोठी घोषणा केली आहे. नोकरदार वर्गासाठी प्राप्तिकराची मर्यादा वाढवण्यात आली आहे. आतापर्यंत असलेली ५लाख रुपयांची प्राप्तिकर मर्यादा वाढवून आता ७ लाख रुपये करण्यात आलेली आहे. त्यामुळे नवीन कर प्रणालीतील लोकांना सात लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही प्राप्तिकर भरावा लागणार नाही.

अर्थमंत्र्यांच्या या घोषणेमुळे सर्वसामान्य पगारदाराना मोठा दिलासा मिळाला आहे. पगारदाराना गेल्या ८ वर्षांपासून प्रतीक्षा होती. अर्थमंत्र्यांनी त्यांची  इच्छा पूर्ण केली आहे. त्यामुले आता ७ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर आता कोणताही कर आकारला जाणार नाही. अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, ही मध्यमवर्गीयांसाठी महत्त्वाची बाब आहे. अर्थमंत्र्यांनी नवीन कररचनेचीही घोषणा केली आहे. प्राप्तिकरात ७ लाखापर्यंतची सूट केवळ नवीन कर प्रणाली अंतर्गत उपलब्ध असेल. आयकर रिटर्न भरण्यासाठी २ पर्याय देण्यात आले आहेत.

नेमका कर किती

शब्दात घ्यायचे असेल तर नवीन कर रचनेमध्ये ० ते ७ लाख रुपये उत्पन्न असलेल्यांसाठी शून्य कर आहे. पण तुमचे हेच उत्पन्न ७ लाखांच्यापुढे म्हणजे ९ लाखांवर गेले असे समंजू. तर पहिल्या ३ लाखांची शून्य कर भरावा लागेल. त्या नंतरच्या ३ लाखांसाठी म्हणजे ४, ५ आणि ६ लाखांसाठी ५ % (१५,००० रु) आणि त्यानंतरच्या ३ लाखांसाठी म्हणजे ७,८ आणि ९ लाखांवर (१०%) म्हणजे ३० हजार रुपये कर भरावा लागेल. म्हणजेच १५ + ३० = ४५ हजार रुपये. याचाच अर्थ ९ लाखांवर एकूण कर ४५ हजार रुपये भरावा लागेल. म्हणजेच जेव्हा तुमचे उत्पन्न ७ लाख रुपयांच्या वर जाते त्यावेळी तुमच्या ३ ते ६ लाख रुपयांवर कर भरावा लागणार आहे.

काय आहे नवीन कररचना

नवीन कररचनेमध्ये ० ते ३ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही. ३ ते ६ लाख रुपये उत्पन्न असलेल्यांना ५ टक्के कर भरावा लागेल.६ ते ९ लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना १० टक्के कर भरावा लागेल. ९ ते १२ लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना १५ टक्के म्हणजेच जवळपास ४४ हजार रुपये एवढा कर भरावा लागेल. तर,१५ लाखांहून अधिक वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना ३० टक्के म्हणजेच जवळपास दीड लाख रुपये कर भरावा लागेल.

 

हे ही वाचा:

दिलासा..चारधाम यात्रेसाठी जोशीमठ सुरक्षित

अनिल परब यांचे कार्यालय तोडले, किरीट सोमय्या भेट देणार

पंतप्रधान मोदी म्हणाले, भारताच्या अर्थसंकल्पाकडे साऱ्या जगाचे लक्ष

…अदानींमुळे म्हणे LIC बुडाली!

प्राप्तिकर रचनेत बदल काय?

७ लाखांपर्यंतचे उत्त्पन्न करमुक्त
३ ते ६ लाख रुपये उत्पन्नावर ५टक्के कर
६ ते ९ लाख रुपये उत्पन्नावर १० टक्के कर
९ ते १२ लाख उत्पन्न रुपये उत्पन्नावर १५ टक्के कर
१२ते १५ लाख उत्पन्न असेल तर २० टक्के कर
१५ लाखांच्यावर उत्पन्न असेल तर ३० टक्के कर

Exit mobile version