करचुकवेगिरीला आळा घालण्यासाठी आयकर विभागाने रुग्णालये, समारंभ हॉल आणि व्यवसायातील रोख व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आयकर विभागानुसार, कर्ज किंवा ठेवींसाठी वीस हजार रुपये किंवा त्याहून अधिक रोख स्वीकारण्यास मनाई आहे आणि असे व्यवहार फक्त बॅंकेद्वारेच केले जावेत, असे आयकर विभागाचे निर्देश आहेत.
एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीकडून दोन लाखांपेक्षा जास्त रक्कम स्वीकारण्यावर देखील निर्बंध आहेत. याशिवाय लोक नोंदणीकृत ट्रस्ट किंवा राजकीय पक्षांकडेही अशाप्रकारे रोखीने व्यवहार करण्यास आयकर विभागाकडून मनाई करण्यात आली आहे. काही संस्था आणि रुग्णालयांमधील रोख व्यवहारांवर सध्या आयकर विभाग लक्ष ठेवून आहे.
कायद्यानुसार, रुग्णालयात दाखल झाल्यावर रुग्णांचे पॅनकार्ड सादर करावे लागतात . मात्र, विभागाच्या अधिकाऱ्यांनी अनेक प्रकरणांमध्ये या नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले आहे. आयटी विभाग आता अशा रुग्णालयांवर कारवाईची योजना आखत आहेत.
हे ही वाचा:
खासदार पूनम महाजन यांच्या हस्ते हनुमान मंदिराचे उद्घाटन
दोन वर्षात प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल महाविद्यालय उभारणार
इकबाल कासकरच्या बॉडीगार्डला मारणाऱ्या फरार आरोपीच्या आवळल्या मुसक्या
“उद्धव ठाकरेंनी शिवाजी महाराजांसारखा तह करायला हवा होता”
आरोग्य सेवेसाठी मोठी रक्कम रुग्णालयात जमा करण्याऱ्या रुग्णांच्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात येणार आहे. आयकर विभागाकडे दाखल वार्षिक माहिती विवरणपत्रातील रोख व्यवहारांचे निरिक्षण देखील विभागाकडून करण्यात येत आहे. या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी, आयटी विभाग रुग्णालये आणि बँक्वेट हॉलसह काही व्यवसायांमधील रोख व्यवहारांवर लक्ष ठेवत आहे आणि एका अहवालानुसार, काही व्यावसायिक विभागाच्या रडारवर आहेत.