जुलैमध्ये १.४० लाख काेटींचे विक्रमी जीएसटी संकलन

जुलैमध्ये १.४० लाख काेटींचे विक्रमी जीएसटी संकलन

जुलै महिन्यात केंद्र सरकारला जीएसटीमधून माेठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळालेले आहे. सरकारला जीएसटी संकलनाच्या माध्यमातून १,४८,९९५ काेटी रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळाले आहे. वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी झाल्यानंतर हे दुसऱ्यांदा मिळालेले सर्वात जास्त जीएसटी उत्पन्न आहे. सरकारला जीएसटीच्या माध्यमातून १.४० लाख काेटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळण्याचा हा सलग पाचवा महिना आहे.

जुलै महिन्यात जीएसटीमधून मिळालेला महसूल हा गेल्या महिन्यात याच कालावधीत मिळालेल्या १,१६,३९३ काेटी रुपयांच्या महुसलाच्या तुलनेत २८ टक्के जास्त असल्याचे सरकारनं म्हटलं आहे. एकूण जीएसटी संकलनापैकी सीजीएसटी २५,७५१ काेटी रुपये,एसजीएसटी ३२,८०७ काेटी रुपये, आयजीएसटी ७९,५१८ काेटी रुपये (वस्तू आयातीसह मिळालेल्या ४१,४२० काेटी रुपयांसह) आणि उपकर १०,९२० काेटी रुपये (आयात वस्तूतून मिळालेल्या ९९५ काेटी रुपयांच्या संकलनासह) मिळालेला आहे.

हे ही वाचा:

कुणाला नको आहे संभाजीनगर, धाराशिव नामकरण?

संजय राऊतांच्या घरी सापडलेल्या नोटांवर ‘एकनाथ शिंदे अयोध्या’ असा उल्लेख

शिवीगाळप्रकरणी संजय राऊत यांच्या अडचणी वाढल्या

आठ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ईडीकडून अटक!

देशातील आर्थिक सुधारणांमधील कामगिरीचा देशाच्या जीएसटी महसुलावर सातत्याने सकारात्मक परिणाम हाेत आहे. २०२२ या वर्षात इ-वे बिलातून ७.४५ काेटी रुपयांचे उत्पन्न मिळाले असून मे २०२२ मधील ७.३६ काेटी रुपयांच्या तुलनेत त्यात किरकाेळ वाढ झाली असल्याचे अर्थमंत्रालयाने म्हटले आहे.

सलग पाच महिने संकलनाचा उच्चांक

“आता सलग पाच महिने, मासिक जीएसटी महसूल १.४ लाख काेटी रुपयांपेक्षा जास्त असून त्यामध्ये दर महिन्याला स्थिर वाढ झालेली दिसून येते. जुलै २०२२ पर्यंत जीएसटी महसुलात गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ३५% वाढ झाली असून ती सर्वाधिक आहे.

Exit mobile version