फाल्गुन महिन्यातल्या होळी या सणाची विशेषतः म्हणजे होळीचे रंग आणि स्वादिष्ट पुरणपोळी. होळीच्या सणाला आपण देवाला नैवैद्य पुरणपोळी आणि कटाच्या आमटीचा दाखवून मगच त्याचा आनंद घेतो. पण यावर्षी पुराणपोळीला लागणाऱ्या जिन्नसांच्या महागलेल्या किमतीमुळे यंदाच्या सणाला महागाईचा रंग चढला आहे. होळीच्या सणाला पुरणपोळीचा स्वाद घेण्यासाठी हरभरा डाळीला प्रचंड मागणी असते होळी म्हणजे पुरणपोळी हि हवीच. पण यंदा च्या वर्षी हरभरा डाळींचे भाव आठ ते दहा रुपयांनी वाढल्याने होळीच्या सणावर महागाईचे सावट आहे.
नवीन हरभरा डाळीची आवक होण्यासाठी अजून बराच अवधी लागणार आहे. होळी सणाच्या निमित्ताने बाजारांत हरभरा डाळीची मागणी वाढली आहे त्यामुळे सणाच्या तोंडावर डाळीचे भाव वधारले आहेत. घाऊक बाजारांत हरभरा डाळींच्या दरांत क्विंटलमागे ३०० ते ५०० रुपये , तर किरकोळ बाजारामध्ये सुद्धा हरभरा डाळीचे भाव आठ ते दहा रुपयांनी महागले आहेत. सणाच्या तोंडावर आणि मागणी असल्यामुळे हि डाळीच्या दराची वाढ तात्पुरती झाली असल्याचे कळत असून, नवीन हरभरा डाळ बाजारात येताच भाव कमी होणार असल्याचे कळत आहे.
हे ही वाचा :
९ मार्चपासून आम्हाला घालू द्या हिजाब! कर्नाटक सरकारचे हे पाऊल…
विमानातील लघुशंकेचे नवे प्रकरण आले समोर…आता एका विद्यार्थ्याने केले कृत्य
सुप्रिया सुळे मांसाहार करून देवदर्शनाला , शिवतारे यांच्या पोस्टमुळे रंगली चर्चा
मनसे नेते संदीप देशपांडेच्या हल्लेखोरांचा ठाण्यांत शोध
‘होळी’ सणाच्या निमित्ताने प्रत्येक घरात पुरणपोळी करण्याची आपली प्रथा आहे. पण आता प्रत्येक घरातील गृहिणी या घराबरोबरच नोकरीची सुद्धा दुहेरी जबाबदारी पेलताना दिसत आहेत. म्हणूनच सणासुदीला पुरणपोळी सारख्या पदार्थांना विकत घेण्यासाठी भरपूर मागणी असते. म्हणून महिला आयत्या बाजारांत मिळणाऱ्या पुराणपोळी कडे त्यांचा काळ असतो. पण पुराणपोळीला लागणाऱ्या सर्व जिन्नसांबरोबरच जसे साखर, गूळ , डाळ , घरगुती गॅस या सर्व वस्तूंच्या किमती वाढल्याने रेडिमेड पुरणपोळ्या सुद्धा महागल्या आहेत. छोट्या पुरणपोळ्या या साधारण २५ रुपयांपर्यंत तर मोठ्या पुरणपोळ्या या ४० रुपयांपर्यंत उपलब्ध असतात.