पगारदारांसाठी केंद्र सरकारची खुशखबर!!

सीबीटी अर्थात सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज यांची दोन दिवसीय बैठक नुकतीच २७ मार्चला आयोजित करण्यात आली होती.

पगारदारांसाठी केंद्र सरकारची खुशखबर!!

केंद्र सरकारने पगारदार नोकरवर्गासाठी आज महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे पगारदारांसाठी ही खुशखबर ठरणार आहे.

कर्मचाऱ्यांच्या पीएफवरील रकमेच्या व्याजदरात आता वाढ करण्यात आली आहे. सीबीटी अर्थात सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज यांची दोन दिवसीय बैठक नुकतीच २७ मार्चला आयोजित करण्यात आली होती. याच बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने यासंदर्भात अधिकृत पत्रक जारी करण्यात येणार आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी कर्मचाऱ्यांच्या पीएफ रकमेवर आठ पूर्णांक शून्य पाच टक्के इतका व्याजदर देण्यात येत होता.

त्यानंतर २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी वाढून सव्वा आठ टक्के व्याज दर देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या निर्णयाचा एकूण फायदा हा पाच कोटी पीएफ च्या खातेधारकांना होणार असल्याचे कळत आहे. याआधी २०१३-१४ मध्ये पीएफ वरील व्याज दर सर्वाधिक म्हणजेच आठ पूर्णांक ७५ टक्के इतके होते. तेच दर २०१८ मध्ये आठ पूर्णांक ६५ टक्के इतके करण्यात आले होते. तर आणखीन खाली दर करून २०१९-२० मध्ये ते साडेआठ टक्के इतके करण्यात आले होते २०२०-२१ वर्षात हेच दर कायम ठेवून त्यानंतर ते २०२१-२२ मध्ये आठ पूर्णांक एक टक्क्यापर्यंत कमी झाले आता या वर्षी या दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

शरद पवार म्हणतात, सावरकरांना माफीवीर म्हणणे योग्य नाही!

बोरिवलीत राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन 

नाटू नाटू गाण्याचे प्रसिद्ध संगीतकार एम. एम. किरवाणींना झाला कोरोना

पंतप्रधान मोदींचे चित्र फाडणाऱ्या गुजरातच्या आमदाराची लायकी न्यायालयाने दाखविली

सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज च्या बैठकीत हे व्याजदर जाहीर झाल्यानंतर ती रक्कम खात्यामध्ये जमा होण्याची प्रक्रिया पार पडणे आवश्यक असते. अस प्रस्ताव अर्थमंत्रालयाला मंजुरीसाठी पाठवण्यात येतो. जेव्हा अर्थमंत्रालय याला मंजुरी देईल त्यानंतरच व्याजाची रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकते. त्याप्रमाणे पुढील वर्षी हि रक्कम जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान , सीबीटीच्या बैठकीत व्याजदरासंदर्भात चर्चा झाल्यानंतर आता पेन्शन बाबत सुद्धा पुढील बैठकीत चर्चा होणार असल्याचे बोलले जात आहे.

Exit mobile version