आंतरराष्टीय नाणेनिधीने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारतीय अर्थव्यवस्था २०२१-२१ च्या आर्थिक वर्षात ११.५% ने वाढेल असा अंदाज वर्तवला आहे. २०१९-२० च्या आर्थिक वर्षात ८% घाट झाल्यानंतर २०२१-२२ च्या आर्थिक वर्षात दोन अंकी वाढ करणारा भारत हा एकमेव देश ठरणार आहे.
‘कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर अनेक लोकांना घेतलेली कर्जे परत करणे शक्य होईलच असे नाही. त्यामुळे नॉन परफॉर्मिंग ऍसेट्स (एनपीए) मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ‘बॅड बँक’ तयार करण्याचा पर्यायही चांगला आहे.” अशी माहिती आंतरराष्टीय नाणेनिधीच्या प्रमुख अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी दिली.
बॅड बँक ची संकल्पना अनेक अर्थतज्ज्ञांनी मंडळी आहे ज्यामध्ये सर्व बँकांकडून थकबाकी असलेली खाती एका बँकेत टाकली जातील आणि ती बँक या खात्यांवर निर्णय घेण्याचे काम करेल. यामुळे इतर बँकांच्या खात्यांच्या नोंदणीमध्ये सुधारणा होईल आणि बँकांना व्यवसाय वाढवण्यासाठी अधिकाधिक लोकांना कर्ज देण्याकडे लक्ष देता येईल.
भारतात सरकारी बँका सर्वाधिक प्रमाणात बँकिंग क्षेत्रात असल्यामुळे सरकारने बॅड बँक तयार केल्यास खाजगी बँकांसाठीसुद्धा चांगला पायंडा पडला जाईल.
आर्थिक व्यवहार आणि चलन पुरवठयातील सरलता या उपायांमुळे भारतीय अर्थव्यवस्था ११.५% ने वाढू शकेल. असे गीता गोपीनाथ यांनी सांगितले.