आयकिया या फर्निचर विक्रेत्या कंपनीने भारतात पाच हजार पाचशे कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. आयकिया ही स्वीडनची कंपनी असून त्यांनी उत्तरप्रदेशच्या नोइडामध्ये भारतातील आयकियाचा पहिला मॉल उघडण्यासाठी जमीन खरेदी केली आहे. निव्वळ जमीन खरेदीचीच किंमत ₹८५० कोटी आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या गुंतवणुकीचे स्वागत केले आहे.
नोएडा अथॉरिटी और IKEA को इस MoU के लिए हृदय से बधाई।
मुझे विश्वास है कि 'IKEA' का नोएडा, उत्तर प्रदेश में निवेश का निर्णय उनके स्वयं के निवेश में कई गुना वृद्धि हेतु निर्णायक सिद्ध होगा।मेरी शुभकामनाएं
— Yogi Adityanath (@myogiadityanath) February 19, 2021
येत्या दोन ते तीन वर्षांत आयकिया आपले शॉपिंग सेंटर तयार करणार आहे. या प्रकल्पासाठी नोएडामध्ये ४८ हजार चौरस मीटरचा भूखंड ताब्यात घेण्यात आल्याची माहिती कंपनीने शुक्रवारी दिली. नोएडा प्राधिकरणाने सेक्टर ५१ मध्ये असलेली जमीन यापूर्वी आयकियाकडे हस्तांतरित केली आहे. आयकियाने या जमीन खरेदीसाठी नोएडा प्राधिकरणाला ₹८५० कोटी दिले आहेत.
हे ही वाचा:
नोएडा प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रितू माहेश्वरी म्हणाल्या की, “आयकियाच्या शॉपिंग सेंटरमधून पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. शिवाय या प्रकल्पातून २ हजाराहून अधिक लोकांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. हा संपूर्ण प्रकल्प सात वर्षात पूर्ण होईल.” अशी माहिती त्यांनी दिली.
“गुंतवणूकीसाठी अनुकूल, पारदर्शक आणि पद्धतशीर धोरणांमुळे उत्तर प्रदेश राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे.” असे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले.