विकास हवा असल्यास प्रकल्पांना विरोध नको

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य

विकास हवा असल्यास प्रकल्पांना विरोध नको

मराठवाड्यात गुंतवणूक अणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. औरंगाबादमधील ऑरिक सिटीच्या विकासासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. येत्या काही महिन्यात ऑरिकमधील गुंतवणुकीला वेग येईल. परंतु विकास हवा असल्यास प्रकल्पांना विरोध करू नये, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुंबईत झालेल्या गुंतवणूक परिषदेत ते बोलत होते .

औरंगाबादसह जालना मराठवाड्यात गुंतवणूक येण्यासाठी आमचा सतत प्रयत्न अहे.आजच्या बैठकीनंतर औरंगाबादेत मोठी गुंतवणूक येईल . महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी अनेक उद्योजक पुढे येत आहेत . त्यामुळे राज्यातही येणाऱ्या काळात मोठी ठी गुंतवणूक होईल अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली.

राज्यात नवीन गुंतवणूक येताच त्यात राजकारण करू नये. विकास हवा असल्यास नवीन प्रकल्पांना विरोध करू नये असे सांगत फडणवीस यांनी येत्या सात वर्षात महाराष्ट्र एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याची आकांक्षा बाळगत असून ते देशातील गुंतवणुकीचे पसंतीचे ठिकाण राहील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं अहे.

हे ही वाचा:

निवडणूक आयोगाविरुद्ध ठाकरे गटाची दिल्ली उच्च न्यायालयात धाव

शिंदे गट ‘या’ तीन चिन्हांचा पर्याय निवडणूक आयोगासमोर ठेवणार

ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरेंविरोधात गुन्हा दाखल

चिन्हं, नाव गोठवल्यावरही ठाकरेंचे गद्दार, खोकासूर, मिंधे गट सुरूच

शिवसेनेचं रडगाणं राजकीय

निवडणूक अयेगाने ठाकरे यांना पुरेसा वेळ दिला. अगदी महिनाभराचा वेळ दिला हो ता. पण वेळ काढून कायदा टाळता येत नाही त्याला सामोरे जावे लागते. सर्वाेच्च न्यायालयाने आपल्या बाजूने निर्णय दिला तर त्याच्या विरोधात बोलायचे ही शिवसेना आणि काँग्रेसची पद्धत झाली आहे. त्यामुळे शिवसेनेचे रडगाणं हे राजकीय रडगाणं असल्याची टीकाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.

Exit mobile version