27 C
Mumbai
Wednesday, January 8, 2025
घरअर्थजगतएमआरएफ 'टायर' वेगात, शेअरचा भाव लाखात

एमआरएफ ‘टायर’ वेगात, शेअरचा भाव लाखात

एक लाखाचा टप्पा ओलांडणारा पहिला स्टॉक

Google News Follow

Related

भारतीय शेअर बाजारात मंगळवार, १३ जून रोजी एक नवा इतिहास रचला गेला. एमआरएफ कंपनीने हा विक्रम रचला असून कंपनीचा समभाग (शेअर) एक लाख रुपयांच्या पार गेला आहे. एक लाखाचा टप्पा ओलांडणारा हा पहिला स्टॉक ठरला आहे. या टायर बनवणाऱ्या कंपनीने इतिहास रचत अनेक गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. एमआरएफ समभाग आज १.३७ टक्क्यांनी वाढला, ज्यामुळे त्याची किंमत १ लाख ३०० च्या वर गेली.

एमआरएफच्या स्टॉकने मंगळवारी इतिहास रचला. शेअर बाजारात (बीएसई) हा शेअर ९९ हजार ५०० वर उघडला आणि सकाळच्या सत्रातील व्यवहारात १ लाख ३०० रुपयांच्या सर्वकालीन उच्चांक किंमतीला स्पर्श केला. गेल्या वर्षभरात या स्टॉकमध्ये प्रचंड वाढ झाल्याचे दिसले.

हे ही वाचा:

‘जाहिरातीमध्ये न पडता डबल इंजिन सरकारचं काम जनतेपर्यंत पोहोचवणं आवश्यक’

ट्यूशन क्लासला दांडी मारून समुद्रकिनाऱ्यावर गेले अन् समुद्रात ओढले गेले

सलग तीन महिने किरकोळ महागाई दर नीचांकी

आनंद महिंद्रांनी नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

१९९३ मध्ये एमआरएफच्या एका शेअरची किंमत ११ रुपये होती आणि २०२३ मध्ये ८ मे रोजी त्यांच्या शेअरची किंमत १ लाख रुपये झाली. २००० साली एमआरएफचा हिस्सा प्रति शेअर १ हजार रुपये होता. २०१२ मध्ये तो १० हजार रुपये आणि २०१० मध्ये २५ हजार रुपयांपर्यंत वाढला. पुढे २०१८ मध्ये एमआरएफ स्टॉक ७५ हजार रुपयांपर्यंत वाढला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा