मुंबईतील ऐतिहासिक बंगल्याची २७६ कोटींना विक्री; यापूर्वीही झालेत असेच कोट्यवधींचे व्यवहार

मुंबईतील सर्वात महागड्या संपत्ती खरेदी व्यवहारांपैकी ठरला एक व्यवहार

मुंबईतील ऐतिहासिक बंगल्याची २७६ कोटींना विक्री; यापूर्वीही झालेत असेच कोट्यवधींचे व्यवहार

स्वप्ननगरी असलेल्या मुंबई शहरात आपलं हक्काचं स्वतःचं घर असावं अशी इच्छा मनात बाळगून हजारो लोक येथे येत असतात. दिवसागणिक हे स्वप्न पूर्ण करत असताना येथे लाखो- करोडोंचे व्यवहार होतात. मुंबईतील उच्चभ्रू परिसरात हे व्यवहार कोट्यवधींच्या किंमतीत सातत्याने होत असतात. याच्या चर्चाही कानावर पडत असतात. मुंबईतील अशाच एका बंगल्याचा झालेला व्यवहार आता चर्चेत आला आहे. स्वातंत्र्यापूर्वी बांधलेला बंगला तब्बल २७६ कोटी रुपयांना विकण्यात आल्याने चांगलाच चर्चेत आला आहे.

मुंबईमध्ये एकापेक्षा एक अशा महागड्या इमारती आहेत. सामान्य माणसाला स्वप्नातही परवडणार नाहीत अशा किंमतीत या इमारतींमधील घरे विकली जातात. पण, सध्या चर्चा सुरू आहे ती मुंबईतील ८५ वर्षे जुन्या बंगल्याची. नेपियन सी रोडवर १९४० साली बांधलेल्या बंगल्याचा व्यवहार झाला. अतिशय जीर्ण आणि खराब अवस्थेत असलेला हा बंगला तब्बल २७६ कोटी रुपयांना विकण्यात आला आहे. यामुळे सर्वांच्याचं भुवया उंचावल्या आहेत. रिअल इस्टेट डेटा फर्मच्या कागदपत्रांनुसार हा बंगला मुंबईतील सर्वात महागड्या संपत्ती खरेदी व्यवहारांपैकी एक ठरला आहे.

मुंबईतील नेपियन सी रोडवर १९४० मध्ये बांधलेला ‘लक्ष्मी निवास’ बंगला विकण्यात आला. १९,८९१ चौरस फूट स्क्वेअर यार्ड परिसरात बांधलेला हा बंगला तळ आणि दोन मजले, एका मजल्याचा आडवा भाग असा आहे. पूर्वी कपाडिया कुटुंबाच्या मालकीचा हा बंगला होता. १९१७ मध्ये १.२० लाख रुपये एवढी याची किंमत होती. शिवाय स्वातंत्र्यापूर्वी उभ्या राहिलेल्या या बंगल्याला ऐतिहासिक महत्त्व देखील आहे. हा बंगला १९४२ ते १९४५ दरम्यान भारत छोडो आंदोलनात राम मनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण, अच्युत पटवर्धन आणि अरुणा आसफ अली यांसारख्या थोर स्वातंत्र्यसैनिकांचे निवासस्थान होते, अशी माहिती आहे. शिवाय या बंगल्यातूनचं नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे ‘आझाद हिंद रेडिओ’चे प्रसारण होत असे.

लक्ष्मी निवास हा वागेश्वरी प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला विकला आहे. या कंपनीच्या संचालकांमध्ये एलिना निखिल मेसवानी यांचा समावेश आहे. त्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या कार्यकारी संचालक निखिल आर. मेसवानी यांच्या पत्नी आहेत. दस्तऐवजांनुसार, विक्रीदारांमध्ये उपेंद्र त्रिकमदास कपाडिया यांच्यासह १५ लोकांचा समावेश आहे. तर खरेदीदार वागेश्वरी प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड आहे. या संपत्तीत जमीन आणि इमारत यांचा समावेश आहे.

हेही वाचा..

लोकसभेत वित्त विधेयक २०२५ मंजूरीसाठी सार होणार

जनतेने कोण गद्दार आणि कोण खुद्दार दाखवून दिले, कामराने माफी मागावी!

तेजस्वी यादवांच्या मार्गातील मोठा अडथळा लालू यादवच

मुंबई आणि परिसरात मशिदींच्या नावावर लँड जिहादचे कारस्थान

Zapkey (रिअल इस्टेट डेटा फर्म) ने मिळवलेल्या मालमत्ता नोंदणी कागदपत्रांनुसार, उदय कोटक आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी वरळी सी फेसजवळील एका निवासी संकुलात २०२ कोटी रुपयांना समुद्रासमोरील १२ अपार्टमेंट खरेदी केले होते. तर, २०२४ मध्ये, दिवंगत अब्जाधीश स्टॉक गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी दक्षिण मुंबईतील मलबार हिल येथील त्यांच्या घरातून दिसणाऱ्या समुद्राच्या दृश्यात अडथळा येऊ नये म्हणून एका निवासी इमारतीमधील सर्व घरे खरेदी केल्याची माहिती समोर आली होती. तसेच देशातील कदाचित सर्वात मोठ्या मालमत्ता व्यवहारांपैकी एक असलेल्या या व्यवहारात, डी’मार्टचे संस्थापक राधाकृष्ण दमानी यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आणि सहकाऱ्यांनी २०२३ मध्ये मुंबईतील वरळी येथे १,२३८ कोटी रुपयांची २८ घरे खरेदी केली होती.

पवार झाले आता पडळकर-पाटलांच्यात खडाखडी ! | Amit Kale | Gopichand Padalkar | Jayant Patil |

Exit mobile version