मागील काही दिवसांपासून स्टीलच्या वाढत्या किंमती अजूनही चढ्याच आहेत. त्यामुळे अनेक स्टील उत्पादकांनी आपल्या स्टीलच्या किंमतीत नुकतीच मोठी वाढ केली आहे. स्टीलच्या हॉट- रोल्ड कॉईलच्या दरात ₹१,५०० प्रति टन एवढी वाढ नोंदवली गेली. त्या बरोबरच टी.एम.टी रेबारच्या किंमतीत ₹२,४०० प्रति टन एवढी वाढ झाली आहे.
जागतीक बाजारपेठेत कच्च्या मालाचा तुटवडा असल्यामुळे स्टीलच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे देशांतर्गत स्टीलच्या किंमतीतही वाढ झाली आहे. त्यावर अनेक उद्योगांनी परस्थितीचा गैरफायदा घेत असल्याची टीका केली आहे.
स्टील कंपन्यांनी चांगल्या दर्जाच्या स्टीलच्या निर्यातीवर सहा महीन्यांची बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्यामुळे देशांतर्गत स्टीलचा पुरवठा वाढेल. ओडीशा मिनरल कंपनी, इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ ओडिशा यासारख्या सरकारी मालकीच्या स्टील उत्पादन कंपन्यांनी, त्यांचे उत्पादन निर्यात करण्याऐवजी त्याची देशांतर्गत विक्री करावी अशी मागणी केली आहे.
स्टील उत्पादकांनी ओएमसी, ओएमडीसी आणि आयडीसीओएल यांना त्यांच्या उत्पादनांची विक्री भारतातच करण्याचे निर्देश दिले आहेत.
‘आय.सी.आय.सी.आय सिक्युरीटीज्’ च्या विनोद करकी यांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारच्या मेक इन इंडिया करिता आखलेल्या विविध धोरणांमुळे भारत स्टील उत्पादनातील एक अग्रणी देश म्हणून पुढे येत आहे.
सध्याची असलेली महागाईची स्थिती अनेक आंतरराष्ट्रीय कारणांमुळे असून, येता काही काळ ती अशीच राहण्याची शक्यता आहे.