अमेरिकेत शेवग्याच्या शेंगाच्या उत्पादनांना मोठी मागणी

अमेरिकेत शेवग्याच्या शेंगाच्या उत्पादनांना मोठी मागणी

भारताने शेवग्याच्या शेंगाच्या चूर्णाची पहिली खेप अमेरिकेकरिता रवाना झाला आहे. शेवग्याच्या शेंगांच्या चूर्णामध्ये असलेल्या पोषक तत्त्वांमुळे त्यांना अमेरिकेत मोठी मागणी आहे.

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने काढलेल्या पत्रकानुसार अधिकाधीक शेवग्याच्या शेंगांचे चूर्ण बनविणाऱ्या कारखान्यांच्या उभारणीनंतर मोठ्या प्रमाणात उत्पादन शक्य होईल. ऍग्रीकल्चरल ऍण्ड प्रोसेस्ड फूड प्रोडक्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी (ए.पी.इ.डी.ए)च्या सहाय्याने भारत येत्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात शेवग्याच्या शेंगांचे चूर्ण निर्यात करू शकेल. याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल. या पत्रकानुसार २९ डिसेंबर रोजी २ टन शेवग्याच्या शेंगांचे चूर्ण अमेरिकेला रवाना झाले.

ए.पी.इ.डी.ए अधिकाधीक चूर्ण उत्पादन केंद्र निर्माण करण्यासाठी मदत देणार आहे. त्यासाठी आवश्यक सोयी-सुविधा निर्माण करण्याचे काम देखील ए.पी.इ.डी.ए करणार आहे. 

तेलंगणामधील चूर्ण उत्पादक मेडीकोंडा न्युट्रीएंट या कंपनीने, चूर्ण उत्पादनाचे कार्य नियोजित पद्धतीने सुरू केले आहे. या कंपनीचा शेवग्याच्या शेंगाच्या पानाचे ४० मिलीयन टन चूर्ण निर्यात करण्याचा मानस आहे. तेलंगणातील पुलकल मोंडल संगरेड्डी जिल्ह्यातील गोंगलूर गावात या कंपनीचे उत्पादन केंद्र आहे. 

आंतरराष्ट्रीय बाजारात शेवग्याच्या शेंगांच्या विविध उत्पादनांना मोठी मागणी आहे. शेवग्याच्या शेंगांच्या पानांचे चूर्ण, तेल यांना सध्या आरोग्याबाबत सतर्क झालेल्या लोकांकडून मोठी मागणी असल्याचे समोर आले आहे.

Exit mobile version