रशिया आणि युक्रनेमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम आता जागतिक बाजारपेठेवर दिसू लागले आहेत. या युद्धामध्ये युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान अमेरिका आणि युरोपीयन राष्ट्रांनी रशियावर घातलेल्या आर्थिक निर्बंधांचा मोठा प्रभाव जागतिक बाजरपेठेवर दिसून येत आहे. मात्र, याचा चांगला परिणाम भारतातील स्टील उद्योगावर दिसून येत आहे.
निर्बंधांमुळे पुरवठा साखळी खंडित झाल्याने स्टीलची किंमत वाढली आहे. युरोपमधून भारतात निर्माण होणाऱ्या स्टीलला मागणी वाढू लागली आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्यात भारताच्या स्टील निर्यातीमध्ये तब्बल ७६ टक्क्यांची वाढ झाली आहे. आकडेवारीनुसार फेब्रुवारी महिन्यात भारताने ११.५७ लाख टन स्टील निर्यात केले आहे. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये स्टील निर्यातीचे प्रमाण ६.५५ लाख टन एवढे होते.
भारतामध्ये स्टील उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा स्टील उत्पादक देश असला तरी देखील स्टील निर्यातीचे प्रमाण कमी आहे. तर रशिया आणि युक्रेनमध्ये भारतापेक्षा स्टीलचे उत्पादन कमी होते, मात्र त्यांचा निर्यातीमधील वाटा भारतापेक्षा अधिक आहे. रशिया आणि युक्रेनकडून युरोप आणि मध्य पूर्वेकडील देशांना स्टीलची निर्यात केली जाते. मात्र युद्धामुळे स्टीलची निर्यात ठप्प झाल्याने, भारतामधून होणारी स्टीलची निर्णयात आणखी वाढण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा:
दहशतवादाशी संबंधित ८१ जणांना सौदी अरेबियात फाशी
‘द काश्मीर फाइल्स’ देशातील प्रमुख शहरांत हाऊसफुल्ल!
मध्य रेल्वेची चित्रीकरणातून २ कोटींची कमाई; हे स्थानक सर्वाधिक पसंतीचे
‘राज्यात नोटीस देण्याची परंपरा नव्हती’ अजित पवारांचा घरचा आहेर
युक्रेन वर्षाला ४४ ते ४५ मिलियन टन स्टीलची निर्यात करतो. तर रशिया एकट्या युरोपीय राष्ट्रांना दरवर्षी १४ ते १५ मिलियन टन स्टील निर्यात करतो. मात्र, रशियावर लावलेल्या निर्बंधांमुळे आणि युद्ध परिस्थितीमुळे स्टील निर्यातीला ब्रेक लागला आहे. सुमारे ३० टक्के स्टीलची निर्यात मंदावली आहे.