24.8 C
Mumbai
Monday, January 6, 2025
घरअर्थजगतआरोग्य सुधारणार ..या आजारांचे होणार समूळ उच्चाटन

आरोग्य सुधारणार ..या आजारांचे होणार समूळ उच्चाटन

आरोग्य क्षेत्रासाठी भरपूर तरतूद

Google News Follow

Related

आज देशाचा २०२३ वर्षाचा अर्थसंकल्प संसदेत सादर करण्यात आला . अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात देशातील आरोग्य क्षेत्रासाठी भरभरून तरतूद केली आहे. पण त्याचबरोबर २०४७ पर्यंत अनेक आजारांपासून मुक्ती देण्याची घोषणाही अर्थमंत्र्यांनी केली आहे.

आरोग्य क्षेत्रात अनेक सुधारणांची गरज आहे. त्यामुळे नवीन वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यात येणार आहे. यासोबतच वैद्यकीय महाविद्यालयात जास्तीत जास्त लॅबची उभारण्यात येणार आहेत . यासोबतच आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी नवीन यंत्रसामुग्री आणल्या जातील जेणेकरून भारतात सर्वात मोठ्या आजारावर यशस्वी उपचार करता येतील असे अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे. पाणी हे अनेक आजारांचे मूळ कारणआहे. त्यामुळे अर्थसंकल्पात स्वच्छ पाण्यावर भर देण्यात आला आहे. नागरिकांना स्वच्छ पाणी मिळाले पाहिजे यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.

अर्थसंकल्पात २०२७ पर्यंत एनिमिया हा आजार मुळापासून समूळ नष्ट करणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. कारण दरवर्षी रक्ताअभावी अनेकांचा मृत्यू होतो. शरीरातील आयर्नच्या कमतरतेमुळे अ‍ॅनिमियाची समस्या उद्भवते. या समस्येवर  मात करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. रक्ताच्या कमतरतेमुळे दरवर्षी हजारो नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. लहान मुलांमधील अशक्तपणा आणि अशक्तपणासारखे आजार दूर करण्यासाठी अनेक कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहेत. त्याच बरोबर २०४७ पर्यंत हा विकार नष्ट करण्याचेही लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

हे ही वाचा:

७ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त झाले पण म्हणजे नेमके कसे?

फडणवीस म्हणाले, सर्वजनहिताय अर्थसंकल्प

निर्मला सीतारामन यांनी कोणत्या ‘सप्तर्षी’चा केला उल्लेख?

आशीर्वाद टॉवरला लागलेल्या भीषण आगीत १३ जणांचा होरपळून मृत्यू,

शात वैद्यकीय महाविद्यालये सुरू कारण्याबरोबरच संशोधनावर भर देण्यात येणार आहे. संशोधनासाठी स्वयंसेवी संस्थांसोबत एकत्र काम करण्यात येणार आहे. वैद्यकीय क्षेत्रात संशोधनासाठी आधुनिक प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. ० ते ४० वयोगटातील व्यक्तींचं हेल्थ स्क्रिनिंग होणार आहे. देशात १५७ वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात येणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा