30 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरअर्थजगतएचडीएफसी बँकेचा स्तुत्य उपक्रम

एचडीएफसी बँकेचा स्तुत्य उपक्रम

Google News Follow

Related

रिलायन्स, एअरटेल यांच्यासारख्या बड्या कंपन्यांबरोबरच आता बँकिंग क्षेत्रातील सर्वात मोठी खासगी बँक असलेली एचडीएफसी बँकही कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा खर्च करणार आहे. विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांसह त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या १ लाखांहून अधिक कुटुंबांना याचा फायदा होणार आहे. कारण कर्मचाऱ्यांवर अवलंबून असलेल्या कुटुंबातील सदस्यांच्या लसीकरणाचा खर्चही बँकेमार्फत केला जाणार आहे. एचडीएफसी बँक दोन अनिवार्य लसींसाठी येणारा खर्चही करणार आहे. यापूर्वी रिलायन्स, एअरटेलसह काही मोठ्या आयटी कंपन्यांनीही आपल्या कर्मचार्‍यांना मोफत लसीकरण जाहीर केले आहे. एचडीएफसी बँकेनंतर आता इतर खासगी बँकादेखील अशी घोषणा करू शकतात.

या नवीन उपक्रमाबद्दल बोलताना एचडीएफसी बँकेचे ग्रुप हेड- एचआर विनय रझदान म्हणाले की, “आमच्या कार्यालयांमध्ये आणि बँक शाखांमधील कर्मचारी, ग्राहकांना सुरक्षित कामकाजाचे वातावरण सुनिश्चित करण्यासाठी आम्ही या संपूर्ण कालावधीत सातत्याने प्रयत्न केले आहेत.”

आमच्या कर्मचार्‍यांनी कोट्यवधी ग्राहकांना सेवा देण्यासाठी चिकाटी, व्यावसायिकता आणि समर्पण दिले आहे. आमच्या कर्मचार्‍यांना आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबीयांच्या लसीकरणाचा खर्च उचलणे हा आमच्या कर्मचार्‍यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा बँकेचा एक छोटासा प्रयत्न आहे.

हे ही वाचा:

उद्यापासून चार दिवस बँका बंद

उद्यापासून चार दिवस बँका बंद

भारताची चीनी टेलिकॉम उत्पादकांना टक्कर

एचडीएफसी बँकेच्या ग्रुप हेड आशिमा भट्ट यांनी सांगितले की, “आमच्यासाठी आमचे कर्मचारी फ्रंटलाइन कर्मचार्‍यांसारखे आहेत. ज्यांनी याची काळजी घेतली आहे की, लॉकडाऊनदरम्यानही बँकिंगसारख्या अत्यावश्यक सेवा ग्राहकांना सतत उपलब्ध राहतील. त्याबद्दल आम्ही त्याचे आभारी आहोत. त्यांच्या आरोग्यासाठी आणि सुरक्षेसाठी आम्ही हे सुनिश्चित करत आहोत की कोविड-१९ पासून संरक्षण मिळावे. म्हणूनच आम्ही त्यांच्या लसीकरणाचा खर्च करत आहोत. यामुळे आमचे कर्मचारी आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबातील सदस्यांना लशीचे सुरक्षा कवच मिळणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा