अधिकाधीक खरेदीमुळे अर्थव्यवस्थेत वृद्धी

अधिकाधीक खरेदीमुळे अर्थव्यवस्थेत वृद्धी

‘द असोसिएटेड चेंबर ऑफ कॉमर्स ऍंड इंडस्ट्री ऑफ इंडिया’ (ऍस्सोचॅम) यांच्या जीएसटी डेटाच्या अभ्यासानुसार लोकांनी केलेल्या अधिकाधीक खरेदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेत वाढ होत आहे.

हे ही वाचा:

महिला अत्याचार, ट्रोलिंग विरोधात अमृता फडणवीस यांचा व्हिडीओ संदेश

गुजरात, राजस्थान, पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू ही राज्ये या बाबत आघाडीवर आहेत. एकूण २३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी जीएसटीमधील सकारात्मक वाढ नोंदवली आहे. त्यामुळे एकंदरीतच खरेदीकडील वाढता कल अधोरेखित होत आहे.

गुजरात राज्य खरेदीबाबतीतील आघाडीचे राज्य ठरले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी फेब्रुवारी २०२१ मध्ये १४ टक्के अधिक जीएसटी गोळा झाला आहे.

गुजरात बरोबरच महाराष्ट्रातूनही मोठ्या प्रमाणात होणारी खरेदी नोंदवली आहे. महाराष्ट्रातून एकूण ₹१६,१०३ कोटी एवढा जीएसटी गोळा झाला आहे. मात्र तरीही महाराष्ट्राची वार्षिक वृद्धी थोडी कमी राहीली आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यांनी मागिल वर्षीच्या तुलनेत दोन टक्क्यांची वाढ नोंदवली आहे.

ऍस्सोचॅमचे सचिव दीपक सूद यांनी दिलेल्या माहितीनुसार अधिकाधीक खरेदी एफएमसीजी, रसायने, खते आणि रिअल इस्टेट या क्षेत्रांतली होती. त्यामुळे इतर अनेक क्षेत्रांना देखील चालना मिळाली आहे.

या राज्यांबरोबरच इतर राज्यांकडूनही जीएसटीत सकारात्मक वाढ नोंदली गेली आहे. मध्य प्रदेश, छत्तिसगढ, जम्मू आणि काश्मिर, हरियाणा, पंजाब, सिक्कीम, झारखंड, ओडिशा, अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, तमिळनाडू या राज्यांतूनही खरेदीत मोठी वाढ नोंदली गेली आहे.

Exit mobile version