फेब्रुवारी महिन्यात जीएसटीचे एकूण संकलन १,३३,०२६ कोटी रुपये

फेब्रुवारी महिन्यात जीएसटीचे एकूण संकलन १,३३,०२६ कोटी रुपये

या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा करापोटी एकूण १,३३,०२६ कोटी रुपये महसूल संकलित करण्यात आला आहे. यामध्ये सीजीएसटी अर्थात केंद्रीय वस्तू आणि सेवा करापोटी २४,४३५ कोटी रुपये, एसजीएसटी अर्थात राज्य सरकारच्या वस्तू आणि सेवा करापोटी ३०,७७९ कोटी रुपये, आयजीएसटी ६७,४७१ कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीवरील करापोटी जमा झालेले ३३,८३७ कोटी रुपये धरून) आणि अधिभार १०,३४० कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीवरील करापोटी संकलित झालेले ६३८ कोटी रुपये धरून) यांचा समावेश आहे.

सरकारने नियमित सामंजस्य म्हणून आयजीएसटीमधून २६,३४७ कोटी रुपये सीजीएसटीला आणि २१,९०९ कोटी रुपये एसजीएसटीला दिले आहेत. सर्व देणी दिल्यानंतर, फेब्रुवारी २०२२ मध्ये केंद्र आणि राज्य सरकारांना अनुक्रमे सीजीएसटी पोटी ५०,७८२ कोटी रुपये आणि एसजीएसटीपोटी ५२,६८८ कोटी रुपये महसूल प्राप्त झाला आहे.

हे ही वाचा:

युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

युक्रेनमध्ये व्होडाफोनसह अनेक टेलिकॉम कंपन्या देणार फ्री कॉलींग

ताज महालच्या ‘नो फ्लायिंग झोन’ मधून विमान गेल्याने खळबळ

उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत उतरले ईडीचे माजी सहसंचालक

गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात संकलित झालेल्या जीएसटी महसुलापेक्षा फेब्रुवारी २०२२ मध्ये १८% अधिक महसूल गोळा झाला आहे. तर फेब्रुवारी २०२० मधील जीएसटी संकलनापेक्षा या वर्षी फेब्रुवारी महिन्यात २६% अधिक जीएसटी संकलित झाला आहे. या वर्षी फेब्रुवारीमध्ये आयात केलेल्या वस्तूंवरील करापोटी ३८% अधिक महसूल जमा झाला असून देशांतर्गत व्यवहारांमधून (सेवांच्या आयातीसह) मिळणारा महसूल गेल्या वर्षी याच महिन्यात याच स्त्रोतांद्वारे संकलित महसुलापेक्षा १२% अधिक आहे.

या चालू आर्थिक वर्षात पाचव्यांदा मासिक जीएसटी संकलनाच्या आकडेवारीने १.३० लाख कोटींचा टप्पा पार केला आहे. देशात जीएसटी लागू झाल्यापासून पहिल्यांदाच जीएसटी अधिभार संकलनाने १०,००० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. यातून अर्थव्यवस्थेतील महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये आर्थिक व्यवहार विशेषतः वाहन उद्योगातील विक्री पुन्हा पूर्वपदावर येत असल्याचे संकेत मिळत आहेत.

Exit mobile version