देशभरात आर्थिक घडामोडींना वेग आला आहे. त्यामुळे वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी संकलनात लक्षणीय वाढ झाली आहे. फेब्रुवारीमध्ये जीएसटी संकलनात तब्बल १२ टक्क्यांनी वाढून १.४९ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. १ जुलै २०१७ रोजी जीएसटी लागू झाल्यानंतर मासिक कमाईचा हा दुसरा सर्वोच्च आकडा आहे.
महागड्या वस्तूंवर ग्राहकांचा खर्च वाढल्यामुळेही जीएसटी संकलनामध्ये वाढ झाली आहे. परंतु जीएसटी संकलन जानेवारीतील १.५८ लाख कोटी रुपयांच्या संकलनापेक्षा कमी आहे. फेब्रुवारी महिन्यात एकूण १,४९,५७७ कोटी रुपयांचा जीएसटी महसूल गोळा झाला आहे.
गेल्या वर्षी याच महिन्यात गोळा केलेल्या जीएसटी महसुलापेक्षा त्यात १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आर्थिक मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. फेब्रुवारी हा साधारणपणे २८ दिवसांचा महिना असल्याने जीएसटी महसूल तुलनेने कमी आहे.
या वस्तूंकडून अधिक जीएसटी अपेक्षित आहे
गेल्या काही महिन्यांत पान मसाला आणि तंबाखू उत्पादकांच्या विरोधात केलेल्या अंमलबजावणीच्या कारवाईमुळे जास्त जीएसटी संकलन होण्याची शक्यता आहे.वाहन विक्री देशात जास्त झाल्यानेही जीएसटी संकलनात वाढ झाली आहे. आयात वाढल्याचा थोडा परिणाम जीएसटीवर होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा:
संजय राऊत यांनी महाराष्ट्रद्रोह केला आहे!
शेकापला फटका, धैर्यशील पाटील भाजपात दाखल
‘कोविड प्रकरणात जवळच्या माणसाला अटक केल्यामुळे संजय राऊत प्रचंड निराश’
फेब्रुवारीसह सलग १२ महिन्यांत मासिक जीएसटी महसूल १.४ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. सर्व मोठ्या राज्यांनीजीएसटी संकलनात मागील वर्षाच्या तुलनेत १० ते २४ टक्के वाढ नोंदवली असल्याचे डेलॉइट इंडियाने म्हटले आहे.