जानेवारी महिन्यात वस्तू आणि सेवा करातून (जीएसटी) ₹१.२ लाख करोड जमा झाले आहेत. भारतीय अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याचे हे लक्षण आहे. या काळात सुमारे ₹९० लाखांच्या परताव्याची नोंद झाली आहे.
३१ डिसेंबर पर्यंत दिलेल्या मुदतवाढी पर्यंत अनेक उद्योगांनी त्यांची संपूर्ण थकबाकी पूर्ण केल्याचा अंदाज काही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
डिसेंबर मधल्या विक्रीचे आकडे, आणि जानेवारी महिन्यात नोंदल्या गेलेल्या परताव्यानुसार भारताच्या आयातीत १६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. याबरोबर देशांतर्गत सेवा क्षेत्राच्या आयातीतून गोळा केलेल्या उत्पन्नात ६ टक्के वाढ झाली आहे.
ही वाढ अपेक्षेपेक्षा जास्त आहे. सामान्यपणे डिसेंबर महिन्यात तिमाहीचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी कंपनी मोठ्या प्रमाणात विक्री करण्यावर भर देतात. त्यामुळे डिसेंबर महिन्यातील उत्पन्न अधिक असते. या तिमाहीतील आयातही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक कंपन्या मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देत आहेत. यात विशेषतः आयटी क्षेत्रातील कंपन्या आघाडीवर आहेत. असे मत प्रतिक जैन पीडब्ल्युसी या आघाडीच्या करक्षेत्रातील कंपनीच्या पदस्थांनी व्यक्त केले आहे.
सरकारने दिलेल्या माहितीनुसार घोटाळेबाजांवर केलेल्या कठोर कारवायांमुळे सरकारच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. नोव्हेंबरच्या मध्यापासून २७४ लोकांना २ हजार ७०० वेगवेगळ्या खटल्यांमध्ये आणि ८ हजार ५०० खोट्या कंपन्यांच्या खटल्यांमध्ये अटक करण्यात आली आहे. या धडक कारवाईमुळे या नकली संस्थांकडून सुमारे ₹८५८कोटी जमा झाले आहेत.
काही तज्ज्ञांच्या मते जीएसटीमधील वाढ यापुढे देखील कायम राहील.