मे महिन्यात देशाच्या वस्तू आणि सेवा करातून मिळणारे देशाचे उत्पन्न हे एक लाख कोटीच्या पार गेले आहे. विशेष म्हणजे सलग आठव्या महिन्यात वस्तू सेवा कराच्या संकलनातून होणाऱ्या उत्पन्नाने १ लाख कोटींचा आकडा पार केला आहे. कोविडच्या महामारीमुळे देशातील अनेक भागात लॉकडाऊन असूनही कर संकलनाच्या बाबतीतले हे आकडे हे आशादायी आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने हे सकारत्मक चित्र मानले जात आहे.
२०२१ च्या मे महिन्यात एकूण १,०२,७०९ कोटी रुपये जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर महसूल संकलित करण्यात आला आहे. त्यापैकी सीजीएसटीचे संकलन हे १७५९२ कोटी रुपये इतके आहे. तर २२६५३ कोटी रुपये एसजीएसटी जमा झाला आहे. ५३१९९ कोटी रुपये आयजीएसटी (वस्तूंच्या आयातीवर जमा २६,००२ कोटी रुपयांच्या समावेशासह) आणि अधिभार ९२६५ कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीवर संकलित ८६८ कोटी रुपये संकलनासह) जमा केला गेला आहे.
हे ही वाचा:
एक कोटी वॅक्सीन टेंडरची सगळी कागदपत्रे जनतेसमोर आणा
पालिकेच्या ट्विटर अकाऊंटसाठी कोटींची उधळण
महिलांना पुन्हा एकदा लोकल प्रवासाची मुभा
मागील वर्षी मे महिन्यातील जीएसटी महसुलापेक्षा मे २०२१ मधील जीएसटीचा महसूल ६५% अधिक आहे. या महिन्यात वस्तूंच्या आयातीमधून मिळणारा महसूल ५६% अधिक राहिला आहे आणि देशांतर्गत व्यवहार (सेवांच्या आयातीसह) पासून मिळणारा महसूल मागील वर्षाच्या याच महिन्याच्या या स्रोतातील महसुलापेक्षा ६९% अधिक राहिला.