गेल्या महिन्यातील म्हणजेच ऑक्टोबरमधील जीएसटी संकलनाचे आकडे आले आहेत. ऑक्टोबर महिन्यात या संकलनाने दीड लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. संकलनाच्या आकडेवारीने ही पातळी ओलांडण्याची ही दुसरी वेळ आहे.
गेल्या महिन्यातील म्हणजेच ऑक्टोबरमधील जीएसटी संकलनाचे आकडे आले आहेत. ऑक्टोबर महिन्यात या संकलनाने दीड लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. संकलनाच्या आकडेवारीने ही पातळी ओलांडण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी एप्रिल २०२२ मध्ये जीएसटी संकलन १.६८ लाख कोटी रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर होते. जीएसटी संकलन १.४० लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त असण्याचा हा सलग आठवा महिना आहे.
अर्थ मंत्रालयाने सांगितले की यावर्षी ऑक्टोबरमध्ये एकूण जीएसटी संकलन १,५१,७१८ कोटी रुपये झाले होते. ऑक्टोबरमध्ये केंद्रीय वस्तू आणि सेवा जीएसटीचा आकडा २६,०३९ कोटी रुपये होता. राज्य वस्तू सेवा म्हणजेच एसजीएसटी ३३,३९६ कोटी, आयजीएसटी ८१,७७८ कोटी रुपये आणि सेस १०,५०५ कोटी रुपये होता.
हे ही वाचा:
फडणवीस म्हणाले, खोटा नरेटिव्ह तीन दिवस चालतो
प्रकल्पांबाबत श्वेतपत्रिका काढून दूध का दूध…करणार?
खोटे ‘सोने’ देऊन २० लाखांना फसवले
रस्ते अपघातात मृत वारकऱ्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांकडून पाच लाख
वर्षभरापूर्वी इतके झाले संकलन
गेल्या वर्षी म्हणजेच ऑक्टोबर २०२१ मध्ये जीएसटी संकलन १,३०,१२७ कोटी रुपये होते. त्याच वेळी, यावर्षी सप्टेंबरमध्ये एकूण जीएसटी संकलन १,४७,६८६ कोटी रुपये होते. हे एक वर्षापूर्वीच्या तुलनेत २६ टक्के जास्त आहे.