काश्मीरमधील अवंतिपुरा भागात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे जाळे मोडण्यात भारतीय सुरक्षा दलाला यश आले आहे. काश्मीर पोलीस, भारतीय सेना आणि राष्ट्रीय राखीव पोलीस दलाच्या संयुक्त कारवाईत ‘जैश’ चे सहा अतिरेकी पकडले गेले.
हे अतिरेकी पाकिस्तान मधील त्यांच्या सहकाऱ्यांच्या संपर्कात होते. भारतीय सैन्यावर झालेल्या अनेक हल्ल्यांमागे या दहशतवादी जाळ्याची महत्वाचे भूमिका होती. या अतिरेक्यांकडून स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. गेल्या महिन्यात पोलिसांनी जैश च्या दोन हस्तकांना अटक केली होती. बिलाल अहमद चोपान आणि मुर्सलीन बसीर शेख अशी या दोघांची नावे आहेत. हे जैश ला शस्त्रास्त्रे पुरवणे, दहशतवाद्यांना आश्रय देणे अशा कुरापती करत.