जम्मू आणि काश्मिर मधील इको- पर्यटनाला चालना देण्यासाठी ७ नव्या ट्रेकिंग रुटना सरकारने परवानगी दिली आहे. ही परवानगी जंगलातील विविध संरक्षित भागातील मार्गांवर दिली आहे. त्यामुळे निसर्गप्रेमींसाठी ही निश्चितच आनंदाची बातमी आहे.
त्याबरोबरच सध्या अस्तित्वात असलेल्या विविध सोयी सुविधा देखील पर्यटनासाठी खुल्या करायला देखील परवानगी दिली आहे. त्याबरोबरच वन विभागाच्या काही सोयी सुविधांना पर्यटकांसाठी खुल्या करण्याची देखील परवानगी दिली आहे. अशी माहिती या विभागाच्या प्रवक्त्यांकडून दिली आहे.
हे ही वाचा:
परमबीर सिंह यांच्या याचिकेवर बुधवारी सुनावणी
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार वन खात्याच्या २९ विश्रामगृहांचे आरक्षण एकाच ब्रँड आणि लोगो खाली १ मे पासून सुरू करण्यात येईल.
वन आणि पर्यावरण विभागाला त्यांची संकेतस्थळे लोकांसाठी आरक्षणासाठी आणि वापरकर्त्या लोकांना सोयीस्कर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याबरोबरच इतर ५८ विश्रामगृहांची दुरूस्ती सुरू करण्यासाठी कर्ज देखील देण्यात आले आहे. हे काम १ जुलै पासून सुरू येणार आहे.
ही सर्व विश्रांतीस्थाने जंगलातील नैसर्गिक सौंदर्यांने नटलेल्या, प्रसन्न अशा भागात आहेत. त्याबरोबरच यातील काही विश्रांतीगृहांचा वापर सरकारी सहलींसाठी देखील केला जाणार आहे. या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार काही वेगवेगळ्या ७ ट्रेकची निर्मीती करण्यात आली आहे. हे मार्ग बाहू कॉन्जर्वेशन रिझर्व, सुधमहादेव कॉन्जर्वेशन रिजर्व, थाईन वाईल्डलाईफ कॉन्जर्वेशन रिजर्व इ. ट्रेकिंगचे मार्ग चालू करण्यात आले आहेत. त्यामुळे निसर्गप्रेमी आणि साहसप्रेमी मंडळीसांठी ही पर्वणी आहे.
याशिवाय दाल लेक मधील हाऊस बोट्सची नोंदणी देखील करण्यात येणार आहे. नव्या धोरणांनुसार पर्यटनाच्या शाश्वत विकासासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या तलावातील नौकांची संख्या या तलावांच्या पर्यावरणाच्या दृष्टीने ९१० पर्यंत मर्यादित करण्यात आली आहे.