ग्रेट ईस्टनचे एस.सी.आयला धोबीपछाड

ग्रेट ईस्टनचे एस.सी.आयला धोबीपछाड

ग्रेट ईस्टन शिपींग कॉ. लिमिटेडने नुकताच सर्वात सर्वात मोठा ताफा असण्याचा किताब प्राप्त केला आहे. यापुर्वी शिपींग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एस.सी.आय)ही सर्वात मोठ ताफा असलेली कंपनी होती. ताफ्याच्या आकारमानाची तुलना करता ग्रेट ईस्टनकडे ६९ जहाजे आहेत, तर एस.सी.आयकडे ५९ जहाजे आहेत आहेत. असे असले तरीही ग्रेट ईस्टन विविध बाबतींत एस.सी.आयच्या मागे राहिली आहे.

एस.सी.आयकडे उपलब्ध असलेल्या सर्व जहाजांची (५९) एकूण वहनक्षमता ५.२९ दशलक्ष टन इतकी आहे. ही भारताच्या एकूण क्षमतेच्या ३५ टक्के आहे. याच्या उलट ग्रेट ईस्टनकडच्या सर्व जहाजांची (६९) एकूण वाहनक्षमता ३.८ दशलक्ष टन इतकी आहे (चार तेल उत्खनन करणाऱ्या यंत्रांना वगळून). जी भारताच्या एकूण क्षमतेपैकी २५ टक्के आहे. 

एस.सी.आयचे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीतील एकूण उत्पन्न ₹2,055.30 कोटी एवढे होते, तर ग्रेट ईस्टनचे याच कालावधीत ₹1,930.67 कोटी राहिले आहे. 

एस.सी.आयच्या 59 जहाजांच्या ताफ्यात दोन कंटेनर वाहक, 13 खनिज तेल वाहक, 15 बल्क वाहक, एक एल.पी.जी/ अमोनिया वाहक, दहा पुरवठा जहाजे, 13 प्रोडक्ट कॅरियर आणि पाच अतिविशाल खनिज तेल वाहकांचा समावेश होतो.

ग्रेट ईस्टनच्या 69 जहाजांच्या ताफ्यात 11 खनिज तेल वाहक, 17 प्रोडक्ट टॅंकर, 5 एल.पी.जी वाहक, 13 बल्क कॅरियर, 19 पुरवठा जहाजे आणि चार तेल उत्खनन यंत्रांचा समावेश होतो. 

ग्रेट ईस्टन कंपनी वापरलेल्या जहाजांच्या खरेदी विक्रीवर अधिक निर्भर आहे. 2018 पासून या कंपनीने नऊ जहाजांची खरेदी केली, सात जहाजे विकून टाकली. 

एस.सी.आय.च्या अधिकाऱ्यांपैकी एकाने दिलेल्या माहीतीनुसार नवरत्नांपैकी एक असा दर्जा एस.सी.आयला प्राप्त असला तरीही विविध कारणांमुळे एस.सी.आय जहाजांची खरेदी-विक्री करत नाही. सरकारी लेखापालांच्या नजरेपासून वाचणे हे त्यातील महत्त्वाचे कारण आहे. आर्थिक वर्ष 2018 मध्ये एस.सी.आयने तीन जहाजे खरेदी केली. ती सर्व वापरलेली जहाजे होती.

Exit mobile version