देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी उडान योजनेने गगनभरारी घेतली आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. नागरी विमान वाहतूक क्षेत्रात गेल्या ६५ वर्षात जे काही साध्य झाले नाही ते गेल्या नऊ वर्षांत १४८ विमानतळ, वॉटरड्रम आणि हेलीपोर्ट बांधून पूर्ण केले आहे. येत्या तीन ते चार वर्षांत २०० विमानतळ करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं असल्याचे ज्योतिरादित्य सिंधिया यांनी म्हटलं आहे.
नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितले की, येत्या तीन ते चार वर्षांत देशातील विमानतळांची संख्या सध्याच्या १४८ वरून २०० पर्यंत वाढवण्याचे लक्ष्य सरकार काम करत आहे. इंडिगो एअरलाइन्सच्या पहिल्या दिल्ली-धर्मशाला-दिल्ली विमानाला ज्योतिरादित्य सिंधिया यांनी हिरवा झेंडा दाखवला त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. मंत्री सिंधिया म्हणाले , मोठ्या मेट्रो विमानतळांना तसेच शेवटच्या माईल कनेक्टिव्हिटी प्रदान करणाऱ्या दूरवरच्या विमानतळांना समान महत्त्व देण्यात आले आहे.
हे ही वाचा:
परदेशातल्या खलिस्तान समर्थकांचे पासपोर्ट होऊ शकतात रद्द, नातेवाईकांवरही कारवाई
केरळच्या महिलेने राहुल गांधींसाठी सर्वोच्च न्यायालयात घेतली धाव
मी महाराष्ट्राची मुलगी, आज माहेरी आल्यासारखे वाटते आहे!
ओमानमधील भर कार्यक्रमात झाकीर नाईकने हिंदू महिलेला केले धर्मांतरित
नागरी विमान वाहतूक क्षेत्रात पूर्ण लोकशाहीकरण आले आहे आणि जे लोक फक्त विमान उडताना बघू शकत होते ते आज त्यात उड्डाण करत आहेत असेही सिंधिया म्हणाले. धर्मशाला विमानतळाच्या विस्ताराबाबत ते म्हणाले की, त्यांचे मंत्रालय त्यासाठी आधीच दोन टप्प्यांच्या योजनेवर काम करत आहे. पहिल्या टप्प्यात सध्याच्या धावपट्टीची लांबी १,९०० मीटर करणे समाविष्ट आहे. दुसऱ्या टप्प्यात बोईंग ७३७ आणि एअरबस ए३२० विमान उतरवण्यास सक्षम असलेल्या विमानतळाची दृष्टी साकारण्यासाठी धावपट्टी ३११० मीटरपर्यंत वाढवण्यात येणार आहे.
हवाई प्रवाशांची संख्या ५६.८२ % वाढून १.२० कोटी वर
फेब्रुवारीमध्ये हवाई प्रवाशांची संख्या ५६.८२ टक्क्यांनी वाढून १.२० कोटी वर गेली आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये ते ७६.९६ लाख प्रवाशांची नोंद झाली होती. यामध्ये इंडिगोने ६७.४२ लाख, एअर इंडिया, विस्तारा, एअर एशियाने २९.७५ लाख प्रवाशांची वाहतूक केलीअसल्याची माहिती डीजीसीएने दिली आहे.देशातील ६ प्रमुख विमानतळांवर प्रवाशांची संख्या सध्याच्या १९.२ कोटींवरून ४२ कोटींपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. या काळात भारतीय कंपन्यांच्या विमानांची संख्या ७०० वरून २,००० पर्यंत वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.