केंद्रीय नागरी विमानचालन मंत्रालयाचे मंत्री हरदिप सिंग पूरी यांनी आज अशी माहिती दिली की, एअर इंडियाच्या खासगीकरणाचे काम मे महिन्यापर्यंत पूर्ण होईल.
पूरी यांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, एका बैठकीत येत्या ६४ दिवसांत निविदा प्रक्रिया बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याबरोबरच विविध इच्छूक खरेदीदारांची निश्चिती करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.
या खरेदी प्रक्रियेत पवन हंस सारख्या इतर काही सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना देखील रस असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
हे ही वाचा:
बीपीसीएलने नुमालीगढ तेल शुद्धीकरण कारखान्यातील विकली भागीदारी
सीएएसाठी भाषण करणारे मनमोहन आता त्याचा विरोध करतात; हाच काँग्रेसचा खरा चेहरा
बांग्लादेशमधील हिंदू भाविकांना मोदी सरकारची अनोखी भेट
“या विमानकंपनीवर अजूनही ₹६० कोटींचे कर्ज आहे आणि आता लवकरात लवकर विकण्याची गरज आहे.” असेही पूरी यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी कोविड-१९च्या दुसऱ्या लाटेचा देखील उल्लेख केला. ते म्हणाले की कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे विमानकंपनीची सेवा १०० टक्के चालू करणे शक्य झाले नाही. या उन्हाळ्यात ही सेवा पूर्ण क्षमतेने चालू करण्याची तयारी होती. परंतु सध्या तरी देशांतर्गत सेवेत कपात कोणत्याही प्रकारचा विचार नसल्याचे त्यांनी सांगितले.
विमान हा प्रवासाचा सुरक्षित मार्ग असल्याचे त्यांनी सांगितले. त्याबरोबरच कोविड-१९च्या निर्बंधांचे पालन न करण्याच्या तक्रारांची दखल घेतली गेली असल्याचेही त्यांनी सांगितले. अशा प्रकारे प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कडक कारवाई केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
गोरखपूर विमानतळाच्या टर्मिनल विस्ताराबाबत ते म्हणाले की, दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतील काही विमानतळांवरून मंत्रालयाला फायदा होत आहे आणि गोरखपूर या विमानतळांपैकी एक आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उद्या गोरखपूरमधील महायोगी गुरू गोरखनाथ विमानतळाच्या टर्मिनलच्या विस्ताराची कोनशिला रचणार आहेत.