आज (३ मे) रोजी सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ नोंदली गेली. सोमवारच्या दिवशी फ्युचर बाजारात ४६,९२१ रुपयांना सोन्याच्या व्यापाराची सुरूवात झाली तर आजच्या दिवसभरात ४७,००० रुपयांची मर्यादा सुद्धा पार केली.
आज सोन्याच्या भावात मोठी वृद्धी पहायला मिळाली. ४७००० रुपयांची मर्यादा पार केलल्या किंमतीने १० ग्रॅमसाठी ४७०७१ रुपयांची आजच्या दिवसातील सर्वोच्च किंमत गाठली. आज सकाळी सुरूवातीला सोन्याचा व्यापार ४६,९७७ रुपयांना होत होता.
हे ही वाचा:
कुणाला सिकंदर मिळाला, कुणाला समाधान
‘आम्ही इथे इंजेक्शन देऊन मारले आहेत’
म्हणे, काँग्रेस पुनावालांना संरक्षण देणार!
केवळ भारतीयच नाही, तर आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्याच्या दरातील वाढ पाहिली गेली. आंतरराष्ट्रीय बाजारात बाजारात सोन्याच्या व्यवहाराला १७६८.७६ डॉलर प्रति औन्स या दराने सुरूवात झाली आणि नंतर ही किंमत वाढत जाऊन १७७५.६९ डॉल प्रति औन्स पर्यंत पोहोचली होती. आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा व्यवहार १७७४.१८ डॉलरच्या आसपास होत होता. ही किंमत मागच्या वेळी बंद होतानाच्या रकमेपेक्षा ५.४२ डॉलरने जास्त होती.
भारताच्या मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि कोलकाता शहरातील बाजारात सोन्याच्या भावातील चढ नोंदली गेली. बाजारात जरी काही ठिकाणी ही वृद्धी असली तरी काही शहरांत मात्र सोन्याच्या भावाला उतरती कळा पहायला मिळाली. या किंमतीपेक्षा स्थानिक दुकानांतील किमती कदाचित वेगळ्या असू शकतात.