अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने होणार स्वस्त

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने होणार स्वस्त

अक्षय्य तृतीया अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. यावर्षी अक्षय्य तृतीया ३ मे रोजी साजरी होणार आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त मानला जातो. त्यामुळे सोन खरेदीदारांसाठी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर आनंदाची बातमी आहे. गेल्या दहा दिवसांत सोन्याच्या दरात २ हजार रुपयांनी घट झाली आहे.

गुड रिटर्न्स वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार शनिवार, ३० एप्रिल रोजी २२ कॅरट सोन्याचे दर प्रति ग्रॅम ४८ हजार ५५० रुपये इतका आहे. तर गुरुवारी सोन्याचे दर ४८ हजार ४५० रुपये इतके होते. एका दिवसात सोन्याचा भाव ४५० रुपयांनी घसरला आहे. तर २४ कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा ५२ हजार ३७० रुपये इतके आहेत. तर रविवार, १ मे रोजी सोन्याचा भाव ४८ हजार ४०० रुपये असून, तोळ्यामागे १५० रुपयांची घसरण झाली आहे.

हे ही वाचा:

‘हुतात्मा स्मारक हे राजकीय विधानं करण्यासाठी नाही तर हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आहे’

LIC IPO के साथ भी !

पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्र दिनाच्या मराठीतून दिल्या शुभेच्छा

Xiaomi चिनी कंपनीला ईडीचा दणका

आज मुंबईमध्ये २२ कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा ४८ हजार रुपये इतके असून २४ कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा ५२ हजार ३७० रुपये आहेत. पुण्यात २२ कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा ४८ हजार ८० रुपये इतके आहेत. तर २४ कॅरट सोन्याचे दर ५२ हजार ४५० रुपये इतके आहेत. तसेच नागपूरमध्ये २२ कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा ४८ हजार ८० रुपये इतके आहेत. तर २४ कॅरट सोन्याचे दर ५२ हजार ४५० रुपयांवर पोहोचले आहेत. त्यामुळे सोन्याच्या दरात घट होत असल्याने अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदी वाढू शकते.

Exit mobile version