या वर्षीच्या एप्रिल-फेब्रुवारी या कालावधीत देशातील सोन्याची आयात ३० टक्क्यांनी घसरून ३१. ८ अब्ज डॉलरवर आली आहे. सरकारने गेल्या वर्षी या मौल्यवान पिवळ्या धातूवरील सीमाशुल्कात वाढ केली होती. सीमा शुल्कातील वाढ आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्चितता याच्यामुळे सोने आयटीमध्ये सातत्याने गॅसर्न झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या ११ महिन्यांत सोन्याच्या आयातीत ३० टक्क्यांनी मोठी घट झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत सोन्याची आयात ४५.२ अब्ज डॉलर इतकी होती. गेल्या वर्षीच्या ऑगस्टपासून सोन्याच्या आयातीत घट झाल्याचे दिसून येत आहे. परंतु याच कलावधीत चांदीची आयात ६६ टक्क्यांनी वाढली आहे.
सरकारने सोन्यावरील सीमाशुल्क वाढवण्यामागे वाढती व्यापारी तूट हे प्रमुख कारण होते. चालू खात्यातील तूट कमी करण्यासाठी केंद्र सरकारने गेल्या वर्षी सोन्यावरील आयात शुल्क १०. ७५ टक्क्यांवरून १५ टक्के केले होते. सोन्याच्या आयातीतील या घसरणीचा व्यापार तूट आणि चालू खात्यातील तूट यावर फारसा फायदा झाला नाही. एप्रिल-फेब्रुवारी २०२२-२३ दरम्यान देशाची व्यापारी व्यापार तूट २४७. ५२ अब्ज डॉलर्स असण्याचा अंदाज आहे. मागील वर्षी याच कालावधीत व्यापार तूट १७२.५३ अब्ज डॉलर होती .
हे ही वाचा:
“राहुलला शिक्षा ठोठावणाऱ्या जजची जीभ कापू”
हुगळीत धावणार देशातील पहिली पाण्याखालून जाणारी मेट्रो
अजित पवारांनी संजय राऊतना पाडले तोंडघशी; ईव्हीएम रद्द करण्याबाबत व्यक्त केले वेगळेच मत
दिल्लीवरून डेहराडूनला जा फक्त २ तासांत
भारत हा जगातील सर्वात मोठा सोने आयात करणारा देश आहे. देशात दरवर्षी सुमारे ८०० ते ९०० टन सोने आयात केले जाते. यातील बहुतेक सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. गेल्या आर्थिक वर्षात एप्रिल ते फेब्रुवारी या कालावधीत दागिन्यांची निर्यात ०.३ टक्क्यांनी घसरली आणि ती ३५. २ अब्ज डॉलर इतकी राहिली. जीजेईपीसीचे माजी अध्यक्ष कॉलिन शाह म्हणाले की, एप्रिल-जानेवारी २०२३ दरम्यान भारताने ६०० टन सोने आयात केले. सोन्याच्या आयातीवरील उच्च शुल्क आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्चिततेमुळे सोन्याच्या आयातीत घट झाल्याचे उद्योगातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.