देशामध्ये कोरोना संक्रमणाची स्थिती अजूनही कमी झालेली नाही आहे. हा काळ अनेकांसाठी आर्थिक तंगीचा असला तरी सोनेखरेदीवर त्याचा तसूभरही परिणाम दिसून आला नाही. सोन्याची आयात चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यात दुपटीपेक्षा अधिक झाली आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीवरून ही माहिती मिळाली आहे.
सोने आता पन्नास हजारांच्या घरात असतानाही भारतात सोन्याची मागणी वाढली आहे. चीननंतर भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोन्याचा ग्राहक आहे. दागिने उद्योगाची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रामुख्याने सोने आयात केले जात आहे. सोन्याची आयात आता ३८ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.
सोने आयात का वाढली
आयातीमध्ये ही वाढ लग्नसराईत सोन्यावरील खर्च वाढल्याने झाली आहे. कोरोना काळात साधारण वर्षभर लग्नसमारंभ रखडले होते. मात्र ही परिस्थिती सुधारल्यानंतर मोठ्या प्रमाणात धुमधडाक्यात लग्न पार पडली. या काळात दागिन्यांची मागणीही तेवढ्याच प्रमाणात वाढली. त्यामुळे परिणामी सोन्याची आयातही वाढली आहे. तर दुसरीकडे देशातून होणारी सोन्याच्या दागिन्यांची निर्यातही वाढली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत हिरे आणि दागिन्यांची निर्यात ७१ टक्क्यांनी वाढून २.९ कोटी डॉलर इतकी झाली आहे.
एप्रिल-डिसेंबर २०२० मध्ये सोन्याची आयात १६.७८ अब्ज डॉलर होती. आकडेवारीनुसार, डिसेंबर २०२१ मध्ये सोन्याची आयात वाढून ४.८ अब्ज डॉलर झाली होती. जी एका वर्षापूर्वी याच महिन्यात ४.५ अब्ज डॉलर होती.
हे ही वाचा:
गावित बहिणींची फाशी रद्द, आता मरेपर्यंत जन्मठेप
पंजाबमध्ये भगवंत मान ठरले ‘आप’ चा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा
पटोलेंच्या गावात मोदी नावाचा गुंडच नाही!
नाना पटोले,’ त्या ‘ गुंडाची छायाचित्रासह माहिती प्रसिद्ध कर
काय आहे सोन्याची देवाणघेवाण ?
भारतात सोने देवाण-घेवाणीचा पहिला एक्सचेंज सुरु करण्यात येणार आहे. सेबीने देशात गोल्ड एक्स्चेंज स्थापन करण्याची शेअर बाजारांना मुभा दिली आहे. आता या नियमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यामध्ये एक ग्राम सोन्याच्या किंमतीपेक्षा सोन्याच्या शेअर्सची किंमत कमी असेल. गुंतवणूकदारांना वायदे बाजारात सहजपणे मोबाईल ॲपद्वारे याची खरेदी- विक्री करता येणार आहे. सोने खरेदीदाराला ई- पावत्या देण्यात येतील आणि जेव्हा गुंतवणूकदाराला
सोन्याची देवाणघेवाण करायची असेल तेव्हा ई- पावती जमा करून शुद्ध सोने गुंतवणूकदारला मिळेल.