‘या’ शहरात आहे सोन्याची नाणी देणारे एटीएम

आता एटीएममधून निघणार सोने

‘या’ शहरात आहे सोन्याची नाणी देणारे एटीएम

आतापर्यंत एटीएएम आपल्याला रोकड देत होती पण आता एटीएएम सोनेही देणार आहे. विश्वास बसणार नाही पण हे खरे आहे. हे ऑटोमेटेड टेलर मशीन (एटीएम) वेगळे आहे. ते रोकड नाही तर सोन्याची नाणी वितरीत करते. देशातील हे पहिले गोल्ड एटीएम आहे.

हैदराबाद येथे बसवण्यात आलेले हे भारतातील पहिले गोल्ड एटीएम आणि जगातील पहिले रिअल टाइम गोल्ड एटीएम आहे. हैदराबादमधील ओपनक्यूब टेकनॉलॉजीज प्रा. लिच्या तांत्रिक सहकार्यातून गोल्डसिक्काने बेगमपेट भागात आपले पहिले गोल्ड एटीएम सुरु केले आहे. त्यामुळे ग्राहक प्रत्यक्ष दागिन्यांच्या दुकानात न जाता एटीएममधून सोने खरेदी करू शकणार आहेत. कोणताही ग्राहक त्याच्या बँकेच्या एटीएम कार्डमधून सोन्याचे नाणे काढू शकतो. एटीएममध्ये डेबिट, क्रेडिट, प्रीपेड आणि पोस्टपेड स्मार्ट कार्ड स्वीकारले जाते.

हे एटीएम ०.५ ग्रॅम ते १०० ग्रॅम या विविध मूल्यांमध्ये सोन्याची नाणी देऊ शकते. गोल्डसिक्काचे सीईओ सी.तरूज यांच्या मते, ग्राहक त्यांच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर करून वेगवेगळ्या मूल्यांची सोन्याची नाणी खरेदी करू शकतात. ही नाणी प्रमाणित प्रूफ पॅकमध्ये वितरित केली जातात. ही सर्व सोन्याची नाणी २४ कॅरेट सोन्याची असतील.

एटीएममध्ये एका वेळी जास्तीत जास्त पाच किलो सोन्याने भरले जाऊ शकते. मात्र, एकावेळी ग्राहक किती सोने काढू शकतो? याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती नाही. एटीएममध्ये थेट बाजार दरानुसार सोन्याची नाणी उपलब्ध होतील, अशी माहिती सांगितले. कोणत्याही ग्राहकाने एटीएममध्ये व्यवहार सुरू करण्यापूर्वी निवडलेल्या नाण्याची किंमत करांसह स्क्रीनवर दिसून येईल.

हे ही वाचा :

भिवंडीत सराईत गुंड गणेश कोकाटेवर अज्ञात गुंडाचा गोळीबार

मुलानेच ७० वर्षीय आईची हत्या केली आणि मृतदेहाची विल्हेवाट लावली, पण

हॉटेलमध्ये शिजला कापड व्यवसायिकाच्या हत्येचा कट

नाशिककरांची ८ तारीख ठरली ‘अपघाताची’

कंपनीच्या म्हणण्यानुसार, जर एखाद्या ग्राहकाच्या व्यवहारासाठी पैसे कापले गेले आणि सोन्याचे नाणे बाहेर आले नाही, तर त्याच्या खात्यात २४ तासांच्या आत पैसे परत मिळतील. यासोबतच एखाद्या ग्राहकाला समस्या असल्यास तो कंपनीच्या हेल्पलाइन क्रमांकावरही कॉल करू शकतो. कंपनी हैदराबादच्या जुन्या शहरातील विमानतळावर तीन मशीन सुरु करण्याची योजना आखत आहे. करीमनगर आणि वारंगल येथे देखील सुरु करण्याचा प्रस्ताव आहे. तसेच येत्या दोन वर्षात भारतभर तीन हजार मशीन्स सुरु करण्याची योजना आहे.

Exit mobile version