‘गो फर्स्ट’ झालेल्या ‘गो एअर’चा आयपीओ

‘गो फर्स्ट’ झालेल्या ‘गो एअर’चा आयपीओ

३,६०० कोटी रुपये उभे करण्याची अपेक्षा

स्वस्त दरात मस्त सेवा देणारी हवाई वाहतूक क्षेत्रातील ‘गो एअर’ या कंपनीने स्वतःचा ब्रँड ‘गो फर्स्ट’ असा करून बाजारात आयपीओ भरला आहे. या आयपीओ द्वारे कंपनलाल ३,६०० कोटी उभे राहण्याची अपेक्षा आहे. त्याशिवाय या कंपनीने आयपीओनंतर विशेष समभाग विक्रीतून १,५०० कोटी रुपये उभे करण्याचा इरादा देखील व्यक्त केला आहे.

मॉर्गन स्टॅन्ली, सीटी आणि आयसीआयीआय सिक्युरिटी हे या समभागांच्या विक्रीचे काम पाहणार आहेत. त्यापैकी उभी राहणारी बहुतांशी रक्कम ही कर्जाच्या परतफेडीसाठी वापरली जाणार आहे.

हे ही वाचा:

मुंबईत आज-उद्या लसीकरण बंद ठेवून काय वीकेंड साजरा करायचा आहे का?

आरटीपीसीआर चाचणी नसेल तर विमानप्रवेश नाही

पब्लिक सब जानती है…देवेंद्र फडणवीसांचे सोनिया गांधींना पत्र

अजून चार राफेल भारतात दाखल होणार

कोविड-१९ महामारीमुळे हवाईक्षेत्राला मोठा फटका बसला आहे. कित्येक विमान कंपन्यांना त्यामुळे खूप मोठा तोटा झाला आहे. गो फर्स्ट देखील या आयपीओच्या माध्यमातून आपले नुकसान कमी करण्याच्या प्रयत्नात आहे. परंतु तरीही जाणीवपूर्वक त्यांनी आयपीओमध्ये कोविडचा कंपनीची आर्थिक परिस्थिती आणि एकूण गंगाजळीवर नकारात्मक परिणाम झाल्याचे स्पष्ट केले आहे.

भारतीय बाजारात गेल्या वर्षभरात ५६ टक्क्यांची वृद्धी झाली आहे. त्यामुळे ‘गो फर्स्ट’ देखील याचा फायदा करून घेऊ इच्छित आहे. कोरोना काळामुळे ‘इंडिगो’ आणि ‘स्पाईस जेट’ नंतर भांडवली बाजारातून भांडवल उभे करण्याचा प्रयत्न करणारी ‘गो फर्स्ट’ ही तिसरी कंपनी ठरली आहे.

Exit mobile version