25 C
Mumbai
Thursday, January 9, 2025
घरअर्थजगतनाव आणि घोषवाक्य द्या, १५ लाख जिंका

नाव आणि घोषवाक्य द्या, १५ लाख जिंका

Google News Follow

Related

मोदी सरकारकडून वेळोवळी अनेक उपक्रम आणि स्पर्धांचे आयोजन केले जाते. या स्पर्धांमध्ये जिंकणाऱ्यांना पारितोषिकही दिले जाते. आताही केंद्रीय अर्थमंत्रालयाने अशाच एका स्पर्धेचे आयोजन केले आहे. डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्युशन या संस्थेचा लोगो, नाव आणि घोषवाक्य तयार करण्यासाठी केंद्र सरकारने प्रस्ताव मागवले आहेत. या तिन्ही गोष्टींसाठी प्रत्येक १५ लाख रुपयांचे बक्षीस मिळेल.

या स्पर्धेत लोगो, नाव आणि घोषवाक्य असे तीन विभाग आहेत. या तिन्ही विभागातून पहिल्या तीन क्रमांकाच्या व्यक्तींना बक्षीस दिले जाईल. पहिल्या स्थानावरील व्यक्तीला पाच लाख रुपये, दुसऱ्या स्थानावरील व्यक्तीला तीन लाख रुपये आणि तिसऱ्या स्थानावरील व्यक्तीला २ लाख रुपये मिळतील. याचा अर्थ या स्पर्धेत एकूण नऊ विजेते निवडले जातील.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदा अर्थसंकल्प सादर करताना डेवलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्युशन स्थापन करण्याची घोषणा केली होती. या माध्यमातून योजनांसाठी निधी पुरवला जाईल. आगामी काळात मोदी सरकार पायाभूत सुविधांवर ११ लाख कोटी रुपये खर्च करणार आहे.

हे ही वाचा:

बीसीसीआयने धमकावल्याचे माजी क्रिकेटपटूचे आरोप

राहुलची राहुलला ‘प्रेम’ळ चपराक

पीव्ही सिंधू पराभूत होऊनही पदकाची आशा?

अजित पवार साहेब तुम्ही लॉलीपॉप बनवायची फॅक्टरी टाका

या स्पर्धेत भाग घेण्यासाठी MyGov या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी लागेल. याठिकाणी स्पर्धेचे नियम आणि अटीही वाचायला मिळतील. १५ ऑगस्ट २०२१ पर्यंत तुम्ही या स्पर्धेसाठी अर्ज करु शकता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा