31 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरअर्थजगतजेनेरिक आधार स्वस्त औषधांसाठी देशभरात १०,००० मेडिकल स्टोअर उघडणार

जेनेरिक आधार स्वस्त औषधांसाठी देशभरात १०,००० मेडिकल स्टोअर उघडणार

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले उपक्रमाचे कौतुक

Google News Follow

Related

.सध्या देशात कोणत्याही आजारावर उपचार करणे खूप महागडे आहे. कोणत्याही व्यक्तीला रोगापेक्षा महागडी औषधे जास्त त्रास देतात. पण ही समस्या सोडवण्यासाठी जेनेरिक आधार पुढील २ वर्षांत देशभरात १०,००० पेक्षा जास्त मेडिकल स्टोअर्स सुरु करणार आहे. या मेडिकल स्टोअर्सवर स्वस्त दरात महागडी औषधे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही या क्रांतिकारी पाऊलाचे कौतुक केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देखील या संकल्पनेचे कौतुक करण्यात आले आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवन येथे जेनेरिक आधारचे संस्थापक आणि सीईओ अर्जुन देशपांडे यांच्याशी या प्रक्लपाच्या संदर्भात चर्चा केली . अर्जुन देशपांडे यांच्या ८० % पर्यंत औषधे स्वस्त करून आरोग्य सेवा क्षेत्रातील क्रांतिकारक निर्णयाचे कौतुक केले. आरोग्यसेवेत क्रांती घडवण्याच्या अर्जुनच्या अथक प्रयत्नांमुळे मधुमेह आणि कर्करोग यांसारख्या अनेक आजारांनी ग्रस्त रुग्णांसाठी ८० % कमी किमतीत औषधे उपलब्ध झाली आहेत.

कर्करोगाच्या रूग्णांसाठी ज्यांना सर्वसमावेशक उपचारांची आवश्यकता असते आणि औषधांच्या किमतीचा अनेकदा रूग्णांच्या कुटुंबावर भार पडतो. जेनेरिक आधार फार्माच्या पुढाकाराने सर्व कुटुंबांना आर्थिक दिलासा देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.जेनेरिक आधारचे संस्थापक आणि सीईओ अर्जुन देशपांडे म्हणाले, “राष्ट्रपतींकडून कौतुक मिळणे हा सन्मान आहे. आमच्याकडे सध्या २००० पेक्षा जास्त मेडिकल स्टोअर्स आहेत आणि पुढील दीड वर्षात संपूर्ण भारतात एकूण १०,००० स्टोअर्स सुरु करणायचा निर्धार देशपांडे यांनी व्यक्त केला आहे.

अवघ्या २० वर्षांचे वय असलेल्या अर्जुन देशपांडे यांचा देशात हेल्थकेअर सेवा परवडण्यायोग्य करण्याचा मानस आहे. जेनेरिक आधारच्या माध्यमातून ते हे का करत आहेत. अर्जुन देशपांडे याने अवघ्या १६व्या वर्षी सुरू केलेल्या जेनेरिक आधार कंपनी स्थापन केली . त्यांच्या या उपक्रमाबद्दल प्रसिद्ध उद्योगपती रत्न टाटा यांनीही देशपांडे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे. या कंपनीने ग्राहकांना किफायतशीर दरात चांगल्या गुणवत्तेची औषधे प्रदान करून फार्मा उद्योगात क्रांती घडवून आणली आहे.

हे ही वाचा:

राहुल गांधींच्या विरोधात ‘सावरकर’ न्यायालयात

गडकरींना धमकी देणाऱ्या जयेश पुजारीवर युएपीए अंतर्गत कारवाई

ढलती का नाम महाविकास आघाडी मन्नू तेरा हुवा, अब मेरा क्या होगा?

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त ‘आंबेडकर यात्रा ट्रेन’

असा सुचला व्यवसाय
मेडिकल स्टोरमध्ये उधारीवर औषध मागणाऱ्या आजोबांना पाहून अर्जुन देशपांडे यांना जेनरिक आधार औषध व्यवसायाचा मार्ग सापडला. जेनेरिक आधार या नावाने स्वतः औषध विक्रीचा व्यवसाय सुरू केला. या व्यवसायाची उलाढाल आता ५०० कोटींपर्यंत गेली आहे. ही औषधे घेणाऱ्या लाखो रुग्णांना स्वस्त औषधे मिळाल्याने फायदा झाला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा