चीनच्या आर्थिक सुधारणेमुळे भारतीय हिरे चमचमले

चीन आणि मध्यपूर्वेतील बाजारपेठेतील मागणी सुधारल्याने भारताच्या रत्ने आणि दागिने निर्यातीमध्ये वाढ

चीनच्या आर्थिक सुधारणेमुळे भारतीय हिरे चमचमले

कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यानंतर चीनची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येताना दिसत आहे. याचा फायदा भारताला झाला आहे. चीनमधील हिरे आणि दागिने निर्यातीत २४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.चीन आणि मध्यपूर्वेतील बाजारपेठेतील मागणी सुधारल्याने भारताच्या रत्ने आणि दागिने निर्यातीमध्ये या वर्षी फेब्रुवारीमध्ये २४ टक्क्यांनी वाढून २८,८३२.८६ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल या संस्थेने ही माहिती दिली आहे.

जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलच्या म्हणण्यानुसार गेल्या वर्षाच्या फेब्रुवारीमध्ये पोलिश आणि पैलू पडलेल्या हिऱ्यांची एकूण निर्यात ३२ टक्क्यांनी वाढून १९,५८२. ३८कोटी रुपयांवर गेली आहे. मागील वर्षी याच कालावधीत ही निर्यात १४,८४१. ९० कोटी रुपयांची झाली होती. गेल्या महिन्यात सोन्याच्या दागिन्यांची एकूण निर्यात गेल्या वर्षातल्या फेब्रुवारी महिन्यातील ४,४८८.३० कोटी रुपयांवरून २९. ८९ टक्क्यांनी वाढून ५,२८९. ६५ कोटी रुपयांवर गेली आहे.

हे ही वाचा:

आगामी निवडणुकांसाठी पंचामृत!

पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती ‘सावित्रीबाई फुले’ यांना शतशः नमन

नागालँडमध्ये पवारांनी केली त्याच रणनीतीची पुनरावृत्ती

अर्थसंकल्पावरील चर्चेत सत्ताधारी – विरोधक भिडणार

संयुक्त अरब अमिराती सोबत सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारवर स्वाक्षरी केल्यानंतर सोन्याच्या दागिन्यांची निर्यात ४५ टक्क्यांनी वाढली आहे. याशिवाय, प्रामुख्याने अमेरिकेत निर्यात होणाऱ्या सोन्याच्या दागिन्यांमध्येही या कालावधीत सुमारे २० टक्क्यांनी सुधारणा झाली असल्याचे कौन्सिलने म्हटले आहे. अमेरिकेत निर्यात होणाऱ्या सोन्याच्या दागिन्यांमध्येही सुमारे २० टक्क्यांची आशादायक सुधारणा दिसून येत आहे.कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यापासून इतर जागतिक बाजारपेठांमध्ये सुधारणा झाली आहे. त्यामुळे पुढील ६ महिन्यांत हिरे आणि हिरे दागिने उद्योगात लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा कौन्सिलने व्यक्त केली आहे.

Exit mobile version