वा रे वा!! एरवी ‘हम दो हमारे दो’ आता काँग्रेसचे अदानींना ‘तुम हमारे हो’

अदांनीचे राजस्थानमधील गुंतवणुकीसाठी स्वागत

वा रे वा!! एरवी ‘हम दो हमारे दो’ आता काँग्रेसचे अदानींना ‘तुम हमारे हो’

रोज उठून अदानी आणि अंबानी या देशातीलच नव्हे तर जागतिक स्तरावरील आघाडीचे उद्योगपती कसे देश चालवत आहेत, अशी टीका करणाऱ्या काँग्रेसकडून आता अदानींना पायघड्या घातल्या जात आहेत. राजस्थानमधील मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राजस्थानमधील गुंतवणुकीसाठी अदानींना आवाहन केले आहे. या दोघांचे फोटो आता व्हायरल होत असून त्यावरून सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरू आहे.

२०२२ इन्व्हेस्ट समिटसाठी अदानी आले होते. त्यावेळी अदानी आणि गेहलोत यांचे एकत्र फोटो प्रसिद्ध झाले. मध्यंतरी काँग्रेस अध्यक्षपदासाठी गेहलोत हे शर्यतीत होते मात्र तेव्हा मुख्यमंत्रीपद सोडणार नसल्यामुळे त्यांचे मुख्यमंत्रीपद जाणार अशी चर्चा सुरू होती. मात्र अखेर ते या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी राजस्थानच्या विकासाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. त्याचा एक भाग म्हणून राजस्थानात गुंतवणूक वाढविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. तशा जाहिराती महाराष्ट्रातही विविध वर्तमानपत्रात दिसू लागल्या आहेत. दोन दिवसांची ही गुंतवणूक परिषद राजस्थानात आयोजित करण्यात आली आहे. तिथे अदानींना बोलावण्यात आले होते. त्यावेळी अदानी यांनी गेहलोत यांची स्तुती केली. त्यांच्याकडे कशी दूरदृष्टी आहे, असे अदानी म्हणाले.

एकीकडे गेहलोत-अदानी भेट होत असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने विधान केले की, जगातील दुसऱ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती पंतप्रधानांच्या निकटवर्ती आहे. पण ही व्यक्ती कधीही जगातील दुसऱ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती ठरली नसती. त्यांचे कधीही त्या यादीत नावही नसते.

गेहलोत यांच्यासोबतच्या आठवणी अदानी यांनी यावेळी सांगितल्या. अवघ्या ३६ महिन्यात कसा कवाई सुपर औष्णिक उर्जा प्रकल्प हा १३२० मेगावॅटचा प्रकल्प मंजूर करण्यात आला. त्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्यात आली. कमीतकमी वेळेत पाण्याचा पुरवठा केला गेला. सर्व मंजुऱ्या मिळाल्या. अदानी समुहाने आतापर्यंत जे विद्युत प्रकल्प उभारले त्यातील हा विक्रमी वेळेत पूर्ण झालेला प्रकल्प ठरला होता, असे अदानी यांनी म्हटले.

हे ही वाचा:

आयसिजी आणि एटीएसची गुजरातमध्ये मोठी कारवाई, ६ जण अटक

भारतीय वायुसेना करणार महिला अग्निवीरांची भरती

नाशिक अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून ‘इतकी’ मदत जाहीर

शिवसेना आमदार वैभव नाईकांची लाचलुचपत विभागाकडून चौकशी

 

गेहलोत यांनी पत्रकारांशी बोलताना जे गुंतवणूकदार राजस्थानात गुंतवणूक करण्यास इच्छुक आहेत, त्यांचे स्वागत केले जाईल. गेहलोत असेही म्हणाले की, गुजराती लोक हे अगदी स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीपासून सक्षम होते. त्यांच्याकडे कापड आणि इतर उद्योग होते आणि कशाची कमी होती?  गुजराती लोक हे कायम उद्योगधंद्याचा विचार करणारे असतात. अनेक मोठे उद्योगपती गुजरातेत राहतात. गौतमभाई हे त्यातलेच. गुजरातला त्यामुळे एक तेज प्राप्त झाले आहे.

यावर भारतीय जनता पक्षाने मात्र गेहलोत यांना लक्ष्य केले आहे. भाजपाचे प्रवक्त अमित मालवीय यांनी अदानी-गेहलोत यांचा फोटो शेअर करत ट्विट केले आहे की, गांधी कुटुंबाशी केले हे आणखी एक बंड. राजस्थानचे मुख्यमंत्री गेहलोत यांनी अदानी यांना गुंतवणूक परिषदेसाठी आमंत्रित केले. हा राहुल गांधींना खुला इशारा आहे. हेच राहुल गांधी अदानी-अंबानी यांच्यावर टीका करताना थकत नाहीत.

राहुल गांधी यांनी हम दो हमारे दो असे वक्तव्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत अदानी-अंबानी यांच्यावर टीका केली आहे.

Exit mobile version