भारतीय प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी पुन्हा एकदा भरारी घेत श्रीमंतांच्या यादीत वरच्या क्रमांकावर आले आहेत. हिंडेनबर्ग वादानंतर गौतम अदानी पुन्हा १०० अब्ज डॉलर्सच्या क्लबमध्ये परतले आहेत. २०२३ च्या सुरुवातीला शॉर्ट-सेलर हिंडेनबर्गच्या आरोपानंतर गौतम अदानी यांनी त्यांची संपत्ती परत मिळवली आहे. बुधवार, ७ फेब्रुवारी रोजी गौतम अदानी यांची एकूण संपत्ती २.७ अब्ज डॉलर्सने वाढून १००.७ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.
गौतम अदानी यांच्यावर आणि त्यांच्या उद्योगावर २०२३ मध्ये अनेक आरोप झाले. मात्र, २०२४ मध्ये त्यांनी जबरदस्त पुनरागमन केले आहे. गौतम अदानी हे १०० अब्ज डॉलर नेटवर्थ असलेल्या श्रीमंतांच्या यादीत दिमाखाने सहभागी झाले आहेत. त्यांच्या संपत्तीत १०१ अब्ज डॉलर्सची भर पडली आहे. या यादीत त्यांची थेट ३० व्या क्रमांकावर घसरण झाली होती. आता ते या यादीत १२ व्या क्रमांकावर पोहचले आहेत. लवकरच पहिल्या १० क्रमांकांमध्ये त्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सनुसार, अब्जाधीश गौतम अदानी यांची संपत्ती एकाच दिवसात २.७ अब्ज डॉलर म्हणजे २२ हजार ६०० कोटी रुपयांहून अधिकने वाढली आहे. त्यामुळे त्यांची नेटवर्थ वाढली आहे.
दरम्यान, अदानी यांना हिंडेनबर्ग प्रकरणात गेल्या वर्षाच्या अखेरीस सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला. त्यानंतर संपत्तीत वाढ झाल्याने गौतम अदानी श्रीमंतांच्या यादीत भारतीय अब्जाधीश आणि आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यापेक्षा केवळ एक क्रमांक मागे आहेत.
हे ही वाचा:
समान नागरी कायदा विधेयक उत्तराखंड विधानसभेत मंजूर
अमेरिकेने भारतासोबत चांगले संबंध निर्माण करण्याची आवश्यकता
नांदेड: धार्मिक कार्यक्रमात जेवणानंतर तब्बल २००० लोकांना अन्नातून विषबाधा!
पाकिस्तान: बलुचिस्तानमध्ये दोन ठिकाणी स्फोट, २२ ठार!
जगातील श्रीमंतांच्या यादीत एलॉन मस्क हे पहिल्या क्रमांकावर आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर एमेझॉनचे जेफ बेजोस आहेत. फ्रान्सचे अब्जाधीशी बर्नार्ड अर्नाल्ट हे या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. पुढे मेटाचे मार्क झुकरबर्ग चौथ्या क्रमांकावर आहेत. तर, बिल गेट्स पाचव्या क्रमांकवर आहेत.