गौतम अदानी बनले आशियाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती…

गौतम अदानी बनले आशियाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती…

जगभरातील शेअर बाजारातील सततच्या घसरणीचा मोठा परिणाम अब्जाधीशांच्या संपत्तीवर झाला आहे. यामुळे अब्जाधीशांच्या क्रमवारीतही बदल झाला आहे. रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना मागे टाकत अदानी समुहाचे संस्थापक आणि अध्यक्ष गौतम अदानी हे आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.

गौतम अदानी यांची संपत्ती मंगळवारी ८८.५ बिलियन डॉलर्स इतकी झाल्याचं ब्लुमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सने म्हटले आहे. मुकेश अंबानींची एकून संपत्ती ही ८७.९ बिलीयन डॉलर्स इतकी आहे. अदानींच्या खासगी संपत्तीमध्ये १२ बिलीयन डॉलर्सची वाढ झाली आहे. त्यामुळे या वर्षांत सर्वाधिक संपत्ती वाढलेले अदानी हे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.

गौतम अदानी यांनी एका छोट्या कमोडिटी ट्रेडिंग कंपनीसह व्यवसाय सुरू केला होता. ज्याचा त्यांनी काही काळाने अनेक बंदरे, खाणी आणि हरित ऊर्जा क्षेत्रात विस्तार केला आहे. काही दिवसांपूर्वी अदानींच्या कोळसा व्यवसायात वाद निर्माण झाला होता, जिथे ग्रेटा थनबर्गसह पर्यावरण कार्यकर्त्यांनी त्यांच्या खाण प्रकल्पावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. पण नंतर गौतम अदानी यांनी आपला व्यवसाय वाढवण्यासाठी जीवाश्म इंधन सोडून पुढे जाण्याचा निर्णय घेतला.

हे ही वाचा:

अहमदाबाद संघाचे झाले बारसे…’हे’ असणार नाव

देशाची थट्टा उडवता, म्हणून काँग्रेस थट्टेचा विषय बनला आहे!

मुंबई १०० टक्के अनलॉक होणार?

महाभारत मालिकेतील ‘भीम’ प्रविणकुमार यांचे निधन

गौतम अदानी यांनी अक्षय उर्जेच्या क्षेत्रात तसेच विमानतळ आणि डेटा सेंटर्सचा व्यवसाय वाढवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्र उभारणी आणि दीर्घ आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी या क्षेत्रांना प्राधान्य दिले होते. स्टॉक मार्केटमध्ये गेल्या दोन वर्षात अदानीच्या काही शेअर्समध्ये सुमारे ६०० टक्‍क्‍यांपर्यंत वाढ झाली आहे.

एचडीएफसी सिक्युरिटीज लिमिटेड, मुंबईस्थित ब्रोकरेज कंपनीचे अध्यक्ष दीपक जसानी म्हणतात, “अदानी समूह जवळपास सर्वच नवीन क्षेत्रांमध्ये योग्य वेळी उपस्थित आहे. अदानी समूहाने परदेशी गुंतवणूकदारांनाही आकर्षित केले आहे. त्यांच्याकडे या क्षेत्रांसाठी भरपूर पैसा आहे.

Exit mobile version